गाजराचा ज्युस
हिवाळ्यात छान लाल आणि रसदार गाजरं मिळतात. त्यांचा ज्युस करुन मुलांना दिला तर त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढायला उपयोग होईल. साहजिकच मुलं कमी आजारी पडतील. गाजर हा अ जीवनसत्त्वाचा उत्तम स्त्रोत आहे. अ जीवनसत्त्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसंच गोवर सारख्या आजारांवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
स्ट्रॉबेरी - किवी ज्युस
स्ट्रॉबेरी आणि किवी ही फळं हिवाळ्यात छान मिळतात. नुसती फळं कापून खाणं मुलांना आवडत नसेल तर ज्युस मधून ती मुलांच्या पोटात गेली तर त्यांचा उपयोग नक्की होईल.
advertisement
गाजर बीट ज्युस
बीट, गाजर मुलांच्या पोटात जाणं आवश्यक असतं. पण कधी कधी मुलं ते खायचा कंटाळा करतात. अशा वेळी बीट, गाजर, काळं मीठ आणि पाणी घालून काढलेला ज्युस मुलांना दिला तर दोन्ही गोष्टी मुलांच्या पोटात जातील. गाजरातून मिळणारं अ जीवनसत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं तर बीट हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत करतं.
सफरचंदाचा ज्युस
सफरचंद हे बारा महिने मिळणारं फळ आहे. हिवाळ्यात मात्र भाज्या आणि फळफळावळ यांचा दर्जा अधिक चांगला असतो. त्यामुळे या दिवसात मिळणाऱ्या सफरचंदाचा ज्युस मुलांना भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळवून देईल.
संत्र-गाजर ज्युस
संत्री आणि लिंबू वर्गीय फळांमधून भरपूर क जीवनसत्व मिळतात. संत्र आणि गाजर यांचा एकत्र ज्युस केला तर त्यातून सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक हे सगळंच मुलांना मिळेल. त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याचा उपयोग होईल.