शारीरिक आणि मानसिक बदलांचा एक महत्त्वाचा काळ म्हणजे किशोरावस्था. लठ्ठपणा किंवा मधुमेहासारखे आजार टाळण्यासाठी पालक अनेकदा मुलांच्या आहाराचं निरीक्षण करतात. पण त्यांच्या हातातल्या कोल्ड्रिंक, किंवा एनर्जी ड्रिंकच्या कॅनचा त्यांच्या मनावर आणि मेंदूवर काय परिणाम होतो यापासून अनभिज्ञ असतात.
सध्या तरुणांमधे ताण आणि चिंता झपाट्यानं वाढत आहे. ही चिंतेची बाब तर आहेच शिवाय साखरयुक्त पेयं जास्त प्रमाणात प्यायल्यानं किशोरवयीन मुलांमधे चिंतेचं प्रमाण वाढण्याचा धोका 34% नी वाढतो असं नवीन संशोधनातून दिसून आलंय.
advertisement
Alzheimer : वायू प्रदूषणाचा मेंदूला धोका, मेंदूच्या आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
जगभरातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार:
जागतिक पातळीवर, दहा ते एकोणीस वयोगटातील सातपैकी एक (14.3%) किशोरवयीन मुलांमधे कोणत्या ना कोणत्या प्रकारची मानसिक आरोग्य समस्या असते. दुर्दैवानं, या समस्या अनेकदा ओळखल्या जात नाहीत आणि त्यामुळे त्यावर उपचार केले जात नाहीत.
किशोरवयीन मुलांमधे आजारपण आणि अपंगत्वाचं प्रमुख कारण नैराश्य, चिंता आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणांमधे आत्महत्या हे मृत्यूचं तिसरं प्रमुख कारण आहे.
बॉर्नमाउथ विद्यापीठातील संशोधकांनी केलेला हा नवीन अभ्यास जर्नल ऑफ ह्यूमन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्समधे प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात, संशोधकांनी किशोरवयीन मुलांच्या खाण्याच्या सवयी आणि मानसिक आरोग्य विषयक अभ्यास आणि सर्वेक्षणांमधील डेटाचं विश्लेषण केलं.
या अभ्यासातील सर्वात मोठा आणि आश्चर्यकारक निष्कर्ष असा होता की, साखरयुक्त पेयं सेवन करणाऱ्या किशोरवयीन मुलांमधे चिंता वाढण्याचा धोका 34% वाढला होता. या अभ्यासात, संशोधकांनी कमी पौष्टिक आणि जास्त कॅलरीज असलेल्या पेयांचा समावेश केला होता, फिझी सोडा, ऊर्जा पेयं म्हणजेच एनर्जी ड्रिंक्स, गोड फळांचे रस आणि शेक, गोड चहा आणि कॉफी, चवदार दूध अशी पेयं यावेळी ठेवण्यात आली होती.
साखरयुक्त पेयांचा केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं या संशोधनातून दिसून आलं.
Hair Care : केस पांढरे होण्याच्या मूळ समस्येवर उत्तर, आयुर्वेदात आहे खजिना
आजपर्यंत, बहुतेक आरोग्य मोहिमा म्हणजेच हेल्थ मिशनमधे खाण्याच्या वाईट सवयींमुळे होणारे शारीरिक आजार याबद्दल अभ्यास झालाय. खाण्याच्या वाईट सवयींमुळे लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह होऊ शकतो.
पण जास्त ऊर्जा असलेल्या पण पोषक तत्वांचा अभाव असलेल्या पेयांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचं या मिशनच्या तज्ज्ञांनी म्हटलंय.
साखरयुक्त पेयं पिणं आणि चिंतेची लक्षणं यांच्यात संशोधकांना एक सुसंगत संबंध आढळला आहे. हे जुन्या अभ्यासांवर आधारित असल्यानं, साखरयुक्त पेयं थेट चिंता निर्माण करतात हे निर्णायकपणे सिद्ध होत नाही.
पण तरीही, डॉ. केसी यांच्या मते, या अभ्यासातून तरुणांमधे जास्त साखरेची पेयं आणि चिंता विकार यांच्यात अनहेल्दी कनेक्शन आहे हे कळून आलंय.
अलिकडच्या काळात किशोरवयीन मुलांमधे चिंतेचं प्रमाण झपाट्यानं वाढलं असल्यानं, हा वाढता धोका रोखण्यासाठी खाण्याच्या सवयी बदलणं खूप महत्वाचं आहे.
