लातूरमधील फिजिशिअन आणि क्रिटिकल केअर एक्सपर्ट डॉ. एहतेशाम शेख यांनी प्रोटिन पावडरमुळे किडनी खरंच खराब होते का? लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "सोशल इन्फ्लुएन्सर किंवा जे जीमला जातही नाहीत ते लोक तुम्हाला प्रोटिनबाबत ज्ञान देतात. पण खरंतर प्रोटिन शरीरचं बिल्डिंग ब्लॉक आहे एक महत्त्वाचा घटक आहे जो तुमच्या शरीरासाठी गरजेचा आहे"
advertisement
Cancer : ठाण्याचे डॉक्टर म्हणाले, 'लवकर लग्न करा, कॅन्सर होणार नाही', कसं तेसुद्धा सांगितलं
"जेव्हा तुम्ही तुमच्या किडनीवर कोणत्या प्रकारचा ताण असेल जसं की तुम्ही पाणी कमी पिताय, आधीपासूनच तुम्हाला किडनीचा आजार किंवा समस्या, तुम्हाला रिनल स्टोन किंवा युरेट्रिक स्टोन्सची समस्या आहे, तुम्हाला किडनीशी संबंधित इन्फेक्शन आहे तेव्हा तुमची किडनी फक्त प्रोटिन पावडरमुळेच डॅमेज होईल असं नाही तर ती डाळ, चिकन, मटण, कडधान्य आणि पनीर यातून मिळणाऱ्या नियमित प्रोटिननेही डॅमेज होईल", असं त्यांनी सांगितलं.
त्यामुळे तुम्हाला किडनीशी संबंधित कोणतीही समस्या नसेल तर बिलकुल घाबरू नका. प्रोटिन पावडर दुधापासून बनलेली असते आणि दूध पूर्णपणे व्हेजेटिरियन सोर्स आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या. वर्कआऊटला जा चांगली बॉडी बनवा. योग्य प्रमाणात, तुमच्या शरीराच्या वजनाच्या किंवा मसल मासच्या हिशेबाने प्रोटिन घ्या, असा सल्ला डॉ. शेख यांनी दिला आहे.
प्रथिने पावडर खरेदी करताना 5 गोष्टी लक्षात ठेवा
प्रोटीन पावडर तुमच्या फिटनेस प्रवासात मदत करू शकते.पण चुकीचं प्रोडक्टन किंवा त्याचं अयोग्य सेवन प्रतिकूल दुष्परिणामांना कारणीभूत ठरू शकतं. म्हणून तुमच्या शरीराच्या आणि गरजांच्या आधारावर प्रोटिन पावडर खरेदी करण्यापूर्वी काही मुद्दे विचारात घेतले पाहिजेत.
सकाळी उठल्यावर ब्रश करू नका; पुण्याच्या डेंटिस्टचा अजब सल्ला, कारणही सांगितलंय
प्रत्येकाला प्रोटीन पावडरची गरज नसते : तुम्ही नियमितपणे मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घेत असाल तर तुम्हाला प्रोटिन पावडरची गरज नाही. ज्यांच्या आहारात प्रोटिन नसतात त्यांच्यासाठी ही पावडर आहे.
योग्य ब्रँड : प्रोटिन पावडरचे बरेच ब्रँड आहेत, त्यामुळे स्वतःसाठी योग्य ब्रँड शोधणं खूपच कठीण झाले आहे. तुम्ही काय निवडता याबद्दल तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि हा निर्णय तुमच्या डॉक्टरांचा किंवा फिटनेस तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर घेतला पाहिजे. नेहमीच प्रतिष्ठित ब्रँड निवडा. तुम्ही ज्या ब्रँडचा विचार करत आहात त्यांची लेबल्स वाचणं चांगलं. कमीत कमी साखर आणि कृत्रिम घटक असलेले ब्रँड निवडा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या : फिटनेस पथ्ये स्वीकारताना नेहमीच आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं चांगलं. तुमचा डाएट चार्ट ऑप्टिमायझ करण्याव्यतिरिक्त डॉक्टर सर्वोत्तम परिणामांसाठी प्रोटीन पावडरचा योग्य डोस देखील सुचवू शकतात. जर तुम्हाला काही समस्या झाली तर तुम्ही पुन्हा डॉक्टरांना भेटू शकता.
प्रथिने पावडर नीट मिसळते का पाहा : हाय क्वालिटी प्रोटीन पावडरचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती सहजपणे विरघळते. जर तुम्हाला तुमच्या डाएट शेकमध्ये गुठळ्या तयार होताना दिसल्या तर प्रोटिन पावडर बदला कारण प्रोटीन पावडरची मिसळण्याची क्षमता आणि पोत तुमच्या एकूण अनुभवावर निश्चितच कायमस्वरूपी परिणाम करू शकतं.
प्रोटीन पावडरची चव तपासा : नवीन प्रोटिन पावडर शोधताना चव हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ही पावडर अनेक वेगवेगळ्या चवींमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्यासाठी सर्वात योग्य असलेली निवड करू शकता.
