पण एक दिवस संगीताला जाणवलं की, जर नातं वाचवायचं असेल, तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. तिने छोटे-छोटे बदल करायला सुरुवात केली. रागाने शांत बसण्याऐवजी प्रेमाने बोलणं, रोज थोडा वेळ नवऱ्यासोबत बसून गप्पा मारणं आणि कधीकधी सरप्राईज प्लॅन करणं. हळूहळू, त्यांच्या नात्यात पुन्हा प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली.
खरं तर, प्रत्येक नात्यात प्रेम आणि आपुलकी टिकून राहण्यासाठी दोन्ही जोडीदारांची मेहनत आणि समजून घेण्याची वृत्ती खूप महत्त्वाची असते. अनेकदा आपण पाहतो की, छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरात भांडणं सुरू होतात आणि हळूहळू यामुळे नात्यात दुरावा येतो. जर तुमच्या बाबतीतही असं होत असेल, तर काळजी करू नका. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही फक्त नात्यात पुन्हा प्रेम आणि आदरच आणू शकत नाही, तर तुमच्या जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट करू शकता.
advertisement
नातं टिकवण्यासाठी सोप्या टिप्स
1) संवाद महत्त्वाचा : अनेकदा आपण आपल्या समस्या मनात दाबून ठेवतो आणि जोडीदारासोबत मनमोकळं बोलत नाही. ही चूक नात्याला कमजोर बनवते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर शांतपणे सांगा आणि त्यांचं मतही ऐकून घ्या. स्पष्ट संवाद हे प्रत्येक नात्याची पहिली गरज आहे.
2) लहान गोष्टींचा मोठा परिणाम : सकाळी 'गुड मॉर्निंग' म्हणणं, उगाचच 'लव्ह यू' म्हणणं किंवा जोडीदाराच्या आवडीचा पदार्थ बनवणं, यांसारख्या लहान गोष्टींमुळे त्यांना खास वाटतं.
3) एकमेकांना वेळ द्या : ऑफिसमध्ये कितीही काम असलं तरी, आठवड्यातून एक दिवस फक्त एकमेकांसाठी ठेवा. बाहेर डिनरला जाणं, चित्रपट पाहणं किंवा घरी बसून जुन्या आठवणींना उजाळा देणं, नात्यात नव्याने उत्साह निर्माण करतं.
4) भांडणं वाढवू नका : वाद प्रत्येक नात्यात होतात, पण ते जास्त काळ टिकवणं धोकादायक आहे. रागाच्या भरात काही बोलून झाल्यावर 'सॉरी' म्हणायला अजिबात संकोच करू नका.
5) आदर आणि मोकळीक : तुमच्या जोडीदाराच्या मताला महत्त्व द्या आणि त्यांना त्यांची वैयक्तिक मोकळीक (personal space) द्या. नात्याला इतकं घट्ट पकडू नका की त्यांना गुदमरल्यासारखं वाटेल.
6) सरप्राईज आणि जुन्या आठवणी : कधीतरी गिफ्ट देणं, अचानक बाहेर जाण्याचा प्लॅन करणं किंवा जुन्या भेटीगाठींच्या आठवणी ताज्या करणं नात्यात रोमांच आणि ताजेपणा भरतं.
7) एक टीम म्हणून विचार करा : समस्यांना 'तुझी किंवा माझी' न मानता 'आपली' समस्या समजा. ही विचारसरणी नातं अधिक मजबूत बनवते.
आणि हो, जर या सगळ्या प्रयत्नांनंतरही काहीच सुधारणा होत नसेल, तर समुपदेशकाची (counselor) मदत घ्यायला घाबरू नका. नातं सांभाळणं सोपं नसतं, पण जर तुम्ही प्रेम, संयम आणि समजूतदारपणाने पुढे गेलात, तर रोजचे वाद मिटतात आणि पुन्हा ते जुनं प्रेम परत येऊ शकतं.
हे ही वाचा : खरं प्रेम विसरणं कठीण, पण अशक्य नाही; 'ब्रेकअप'नंतर फक्त 'या' 5 गोष्टी फॉलो करा, मन होईल मोकळं!