जाणून घेऊयात हाडं मजबूत करणाऱ्या या 'कोमल' पानांविषयी
कसुरी मेथी हा अनेकांच्या आहारातला एक पदार्थ. जेवणाची चव वाढवणाऱ्या कसुरी मेथीचे आयुर्वेदीक फायदे फारच कमी जणांना माहिती असतील. कसुरी मेथीमध्ये जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम फायबर्स आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपल्या शरीराला एक नाही तर अनेक फायदे होतात.
advertisement
जाणून घेऊया कसुरी मेथीचे आश्चर्यकारक फायदे
शरीराला उबदार ठेवते
कसुरी मेथीचा पोत हा उष्ण आहे. त्यामुळे हिवाळ्यात कसूरी मेथी शरीराला आतून उबदार ठेवते. कणिक मळताना त्यात कसुरी मेथी घालून चपाती केल्यास त्या चपात्यांच्या पौष्टिक गुणधर्मांमध्ये वाढ होते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
कसुरी मेथीत फायबर्स हे अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्तामध्ये कसुरी मेथीचा वापर केल्यास किंवा कसुरी मेथीच्या चपात्या खाल्ल्यास शरीर आतून उबदार राहील. फायबर्समुळे पोट भरलेलं राहील शिवाय पचनही सुधारेल. ज्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फायदा वजन कमी व्हायला होईल.
हे सुद्धा वाचा : Benefits of Avocado: रोज ॲवाकॅडो खाल्ल्याने होतील अनेक फायदे, दूर पळतील गंभीर आजार
पचनासाठी फायद्याची
कसुरी मेथी ही पोटासाठी एका रामबाण औषधापेक्षा कमी नाही. कसुरी मेथीत असलेले अँटिऑक्सिडंटमुळे पचनक्रिया सुधारून आतड्यांवरचा ताण कमी होतो. यामुळे पोटाला आराम मिळतो. तर फायबर्समुळे अन्न सहज पचायला मदत होते. त्यामुळे गॅसेस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटफुगी असे आजार टाळता येतात.
डायबिटीस रूग्णांसाठी फायद्याची
कसुरी मेथीमुळे कार्बोहायड्रेट्स लवकर पचत नाही. त्यामुळे ते पचून रक्तात साखर उतरण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे कसुरी मेथीचं सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता कमी होऊन पॅक्रियाजला आराम मिळतो.
हाडांसाठी फायदेशीर
कसुरी मेथीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं. यामुळे हाडांचा ठिसूळपणा दूर होऊन हाडं मजबूत व्हायला मदत होते. शिवाय कसुरी मेथीतल्या विविध पोषक तत्वं आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. थंडीत जर तुमच्या हातापायांना सूज येत असेल तर त्यावरही कसुरी मेथी गुणकारी आहे.
