Benefits of honey : हिवाळ्यात मध खाण्याचे ‘इतके’ फायदे; ‘या’ टिप्स वापरून ओळखा मधातली भेसळ

Last Updated:

Health benefits of honey in Marathi : मधातले अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हिवाळ्यात शरीराचं रक्षण करतात.नैसर्गिक आणि शुद्ध मधामुळे शरीराला विविध फायदे होतात.मात्र सध्या भेसळयुक्त मधही बाजारात सर्रासपणे उपलब्ध आहे. जाणून घेऊयात मधाचे फायदे आणि भेसळयुक्त मध कसा ओळखायचा ते.

प्रतिकात्मक फोटो : मध खाण्याचे ‘इतके’ फायदे; ‘या’ टिप्स वापरून ओळखा मधातली भेसळ
प्रतिकात्मक फोटो : मध खाण्याचे ‘इतके’ फायदे; ‘या’ टिप्स वापरून ओळखा मधातली भेसळ
मुंबई: अनादीकाळापासून विविध आरोग्यदायी फायद्यांसाठी मध हे ओळखलं जातं. मधाला नैसर्गिक सुपरफूड असंही म्हणातात. मध जरी वर्षभर मिळत असलं तरीही हिवाळ्यात तर मध खाणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. कारण बदलत्या वातावरणामुळे हिवाळ्यात आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी मधातले अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराचं रक्षण करतात. नैसर्गिक आणि शुद्ध मधामुळे शरीराला विविध फायदे होतात. मात्र सध्या भेसळयुक्त मध बाजारात सर्रासपणे उपलब्ध आहे. जाणून घेऊयात मधाचे फायदे आणि भेसळयुक्त मध कसा ओळखायचा ते.

Health benefits of Honey: हिवाळ्यात मध खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे; वापरा ‘या’ सोप्या टिप्स आणि ओळखा मधातली भेसळ

advertisement

प्रतिकारशक्ती वाढवते:

मधात असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांना दूर ठेवता येतं.

पचनास मदत:

गरम पाण्यात मध टाकून प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे अतिरिक्त चरबी जळून वजनही कमी व्हायला मदत होते.

घसा खवखवणे:

हिवाळ्यात कोरडेपणामुळे अनेकदा घशाच्या तक्रारी वाढतात. परंतु मधातील अँटिबॅक्टेरिअल गुणधर्म बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. त्यामुळे गरम पाण्यात किंवा दुधात मध टाकून प्यायल्यास अधिक फायदा होतो. हिवाळ्यात चहात साखरेऐवजी मध घातल्यास अधिक फायदा होतो.
advertisement

नैसर्गिक उर्जा:

हिवाळ्यात थंड वातावरणात शरीर गरम ठेवण्यासाठी अधिक उर्जेची गरज असते. अशावेळी मधातले ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सारख्या नैसर्गिक शर्करा शरीराला जलद आणि जास्त वेळ टिकणारी ऊर्जा देतात.

त्वचेसाठी फायद्याचं:

मध हे ह्युमेक्टंट म्हणून काम करतं, ज्यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो. त्यामुळे थंडीत त्वचा कोमल आणि तजेलदार राहायला मदत होते.
advertisement

भेसळयुक्त मध कसा ओळखायचा?

शुद्ध आणि भेसळयुक्त मध ओळखणं काही कठीण नाहीये. जुनी जाणती लोकं तर वासाने शुद्ध आणि अशुद्ध मध ओळखायचे. मधातली भेसळ ओळखण्याच्या काही घरगुती टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोतच. पण त्याआधी मध विकत घेतानाची ही एकदम सोपी ट्रिक जाणून घ्या. म्हणजे तुमची फसवणूक टळेल. जेव्हा तुम्ही मध विकत घेतात तेव्हा एका चमच्याने भांड्यात टाकून बघा. ते फार पातळ असेल किंवा चमच्यातून भांड्यात ओतल्यानंतर जर मागे पाण्याचा अंश राहिला तर समजून जा की त्या मधात भेसळ आहे.
advertisement

पाण्याची चाचणी:

एका ग्लास पाण्यात एक चमचा मध घाला. शुद्ध मध तळाशी स्थिर होईल, तर भेसळयुक्त मध पाण्यात विरघळून जाईल.यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या मधात किती भेसळ आहे ते.

मधाचा दिवा:

देवासमोर जसा आपण तुपाचा किंवा तेलचा दिवा लागतो तसंच मधाची शुद्धता ओळखण्याची तुम्ही मधाचा दिवा लावू शकता. कापसाच्या एका वातीला किंवा फुलवातीला मधात भिजवा. जर ते मध शुद्ध असेल तर ती वात व्यवस्थित जळेल. जर त्यात भेसळ असेल तर वात योग्य पद्धतीने जळणं सोडा, ती पेटायलाही उशीर होईल
advertisement

स्फटिकीकरण:

शुद्ध मध नैसर्गिकरित्या कालांतराने स्फटिक बनतं. थंडीत तुपाप्रमाणे मधही गोठतं. मात्र तुमचं मध हे थंडीत गोठलं नाही तर त्यात निश्चितपणे भेसळ ही असणारच.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of honey : हिवाळ्यात मध खाण्याचे ‘इतके’ फायदे; ‘या’ टिप्स वापरून ओळखा मधातली भेसळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement