Honey Benefits : आरोग्याच्या अनेक समस्या दूर करणारा सर्वगुणकारी मध...आजीच्या बटव्यातलं रामबाण औषध, अनेक आजारांना दूर करण्याची आहे ताकद
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला मध आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मध तुमचं आरोग्य तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो.
मुंबई : खोकला झाला की मधाचं चाटण देण्याची पद्धत काही घरांत वापरली जाते. आरोग्यासाठी मध हा खूप गुणकारी मानला जातो. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला मध आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मध तुमचं आरोग्य तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो.
आजीच्या काळापासून मधाचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश केला गेला आहे. मिठाईपासून ते चहापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारे मध वापरता येतो. पाहूयात मधाचे आरोग्यदायी फायदे
हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त -
मध तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. मधाचं योग्य प्रमाणात नियमित सेवन केलं तर गंभीर आणि घातक हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. मधामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्यानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी, हृदयाचे ठोके सुधारण्यासाठी, रक्तदाब पातळी संतुलित करण्यासाठी आणि शरीरातील खराब चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठीही मधाचा उपयोग होतो.
advertisement
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर -
प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मध प्रभावी ठरू शकतो. कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर मध खूपच उपयोगी आहे. चहा किंवा कोमट पाण्यात मध मिसळून प्या, याचा चांगला परिणाम तुम्हाला नक्की दिसून येईल.
advertisement
गंभीर आजारावर गुणकारी मध -
मधुमेह, कुष्ठरोग आणि उलट्या यांसारख्या आजारांवरही मध फायदेशीर ठरू शकतो. मधात असलेली कर्बोदकं, आणि जीवनसत्वांचा शरीराला फायदा होतो. रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, एमिनो ॲसिड आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध मधतुमच्या आरोग्यासाठी तसंच तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतो.
आरोग्यासाठी मध का आवश्यक -
मधामुळे पचनसंस्था चांगली आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी मध
advertisement
एक रामबाण उपाय आहे. चांगल्या झोपेसाठी, रात्री चांगली झोप येण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता.
वजन कमी करण्यासाठी मधाचा प्रभावी उपयोग होतो. मधामुळे चयापचयचा वेग वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत
होते. त्वचा मुलायम राखण्यासाठीही मधाचा वापर होतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2024 3:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Honey Benefits : आरोग्याच्या अनेक समस्या दूर करणारा सर्वगुणकारी मध...आजीच्या बटव्यातलं रामबाण औषध, अनेक आजारांना दूर करण्याची आहे ताकद