Beauty Tips: कोणीच सांगत नाही या 5 स्किनकेअर स्टेप्स, फॉलो करा आणि 100% मिळवा बेबी सॉफ्ट स्किन

Last Updated:

रोज न चुकता स्किन केअर रूटीन तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर होतील. तसेच त्वचा सुंदर होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.

रोज न चुकता स्किन केअर रूटीन तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर होतील. तसेच त्वचा सुंदर होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.
रोज न चुकता स्किन केअर रूटीन तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर होतील. तसेच त्वचा सुंदर होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.
प्रत्येकाला आपली त्वचा मऊ, तजेलदार आणि चमकदार असावी असं वाटतं. त्वचा मऊ आणि तजेलदार राहावी यासाठी आपण फेस पॅक, स्क्रब, फेशिअल अशा कित्येक ब्युटी ट्रीटमेंटचा आधार घेतो. पण या उपायांमुळे क्षणिक फायदा होतो. तुम्हाला तुमची त्वचा चमकदार हवी असेल तर त्यासाठी योग्य स्किन केअर रूटीन फॉलो करावं लागेल. रोज न चुकता स्किन केअर रूटीन तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर होतील. तसेच त्वचा सुंदर होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. त्वचेची काळजी घेण्याच्या पाच प्रभावी पद्धतींबद्दल जाणून घेऊयात.

त्वचेची काळजी घेण्याच्या पाच प्रभावी पद्धती

पहिली पद्धत
क्लिन्झर मिल्कने चेहरा सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ करा. असे केल्याने चेहऱ्यावरील धूळ निघून जाईल आणि त्वचेला आराम मिळेल. यानंतर चेहऱ्यावर टोनर लावा, ज्यामुळे त्वचेवरील उघडलेली छिद्र मिटतील.
दुसरी पद्धत
या दोन गोष्टी केल्यावर तुम्ही तुमच्या स्किन टाइपनुसार चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. हे तुमच्या त्वचेला मऊ ठेवते व मॉइश्चर करते. तसेच तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेलही लावू शकता. मात्र जर तुमची त्वचा संवेदनशील आणि तेलकट असेल तर तेल लावू नका.
advertisement
तिसरी पद्धत
स्किन रूटीनमधील एक महत्त्वाचा भाग सनस्क्रीन आहे, त्यामुळे सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला घातक यूव्ही किरणांपासून सुरक्षित ठेवते. वातावरण कसेही असेल तरी दिवसा एसपीएफ सनस्क्रीन वापरा. यामुळे त्वचेवर डाग निघून जातील, तसेच सुरकुत्या कमी होतील.
चौथी पद्धत
त्वचेचं सौंदर्य बाह्य आरोग्यासोबतच अंतर्गत आरोग्यावरही अवलंबून असते. त्यामुळे पौष्टिक आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. फक्त वेगवेगळी उत्पादनं लावल्याने स्किन केअर रूटीन पूर्ण होत नाही, त्यासाठी चांगला आहारही महत्त्वाचा आहे. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी आणि ई असलेल्या फळं आणि भाज्यांचे सेवन करा. हे अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
advertisement
पाचवी पद्धत
स्किन केअर रूटीनमधील शेवटचा टप्पा एक्सफोलिएटिंग आहे. आठवड्यातून 1-2 वेळा एक्सफोलिएटर वापरा, ते त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करेल. तुम्ही आतापासून या स्किन केअर रूटीनच्या पद्धतींचा वापर केला तर तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली जाईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Beauty Tips: कोणीच सांगत नाही या 5 स्किनकेअर स्टेप्स, फॉलो करा आणि 100% मिळवा बेबी सॉफ्ट स्किन
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement