आता 2026 साल संपायला काही दिवसच शिल्लक आहात. काही लोक न्यू इयरच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत तर काही लोक सुट्ट्यांचा आनंद घेण्याचे नियोजन करत आहेत. यासोबतच अनेकांनी डिसेंबरमध्ये सहलीला जाण्याचे नियोजनही केले आहे. तुम्हीही 2026 मध्ये दीर्घ सुट्टी घेऊन सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर ही यादी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया 2026 मध्ये तुम्हाला कधी मोठा वीकेंड मिळेल.
advertisement
जानेवारी : 1 ते 4 जानेवारी पर्यंत तुम्ही दीर्घ वीकेंडचा आनंद घेऊ शकाल. नवीन वर्ष गुरुवारी आहे. शुक्रवारची सुट्टी घ्या, त्यानंतर शनिवार आणि रविवार आहे. अशापेंकरे तुम्ही चार दिवसांची सुट्टी साजरी करू शकता. त्यानंतर 23 ते 26 जानेवारी पर्यंत आणखी एक लॉन्ग विकेंड मिळू शकतो. 23 तारखेला वसंत पंचमी आहे, त्यानंतर एक वीकेंड आहे आणि 26 तारखेला प्रजासत्ताक दिन असतो. मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी आहे, ज्यामुळे तुम्हाला एक वेगळा सुट्टीचा दिवस मिळतो.
मार्च : मार्च महिना हा एक बोनस महिना आहे. होळी 3 मार्च रोजी आहे आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याचे शनिवार-रविवार एकत्र केल्यास, तुम्हाला 4 दिवसांचा मोठा ब्रेक मिळू शकतो. त्यानंतर 19 मार्चला गुढीपाडवा आहे, 20 तारखेची सुट्टी घ्या आणि 21-22 चा विकेंड धरून पुन्हा 4 दिवसांच्या सुट्ट्या तुम्हाला मिळू शकतात.
मार्चमध्ये आणखी एक लॉन्ग विकेंड ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. 26 ते 31 मार्च पर्यंत. 26 तारखेला राम नवमी आहे, 27 ला एक दिवस सुट्टी घ्या, 28-29 चा वीकेंड, त्यानंतर 30 ला पुन्हा एक सुट्टी घ्या आणि सोमवारी 31 तारखेला महावीर जयंतीची सुट्टी असेल. असा तुम्हाला एका आठवड्याचा मोठा ब्रेक मिळू शकतो.
एप्रिल : एप्रिलमध्ये 3 तारखेला गुड फ्रायडे आणि 4-5 ला शनिवार-रविवार. हादेखील एक वीकेंड तुम्हाला मिळतो.
मे : शुक्रवारी 1 तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे. त्यानंतर शनिवार रविवार.. हाही एक विकेंड तुमच्यासाठी आहे.
जून : जूनमध्ये 26 तारखेला मोहरम आहे. त्यानंतर 27-28 विकेंड आहे.
ऑगस्ट : 25 ला ईद-ए-मिलादची सुट्टी आहे, 26 ला नारळी पौर्णिमेची सुट्टी घ्यावी लागेल, 28 ला रक्षाबंधन आणि 29-30 चा वीकेंड आहे. म्हणजे तुम्हाला 6 दिवसांचा ब्रेक मिळू शकतो.
सप्टेंबर : सप्टेंबरमध्ये दोन लहान वीकेंड्स तुम्हाला मिळू शकतात. 4 तारखेला जन्माष्टमीची सुट्टी घ्या आणि नंतर 5-6 विकेंड आहे. त्याचप्रमाणे 12-13 विकेंड आणि 14 सप्टेंबरला हरतालिकेची सुट्टी आहे.
ऑक्टोबर : शुक्रवारी 2 तारखेला गांधी जयंती आहे आणि त्यानंतर 3-4 विकेंड आहे. आणखी एक लॉन्ग विकेंड तुम्ही ऑक्टोबरमध्ये प्लॅन करू शकता. 17-18 तारखेला विकेंड आहे, त्यानंतर 19 ला एक सुट्टी घ्यावी लागेल आणि 20 ऑक्टोबरला दसऱ्याची सुट्टी आहे.
नोव्हेंबर : 21-22 ला विकेंड आहे, त्यानंतर सॊमवचारी सुट्टी घ्यावी लागेल आणि 24 तारखेला गुरु नानक जयंतीची सुट्टी आहे. हादेखील एक लॉन्ग विकेंड तुम्ही प्लॅन करू शकता.
डिसेंबर : 25 तारखेला शुक्रवारी ख्रिसमस पाटलाची सुट्टी आहे आणि त्यानंतर 26-27 विकेंड आहे. तुम्ही पुढच्या वर्षी या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचे प्लॅन करू शकता. 2026 हे वर्ष प्रवासासाठी परिपूर्ण आहे. यामध्ये अशा अनेक सुट्ट्या आहेत, ज्यात तुम्ही एक दिवस सुट्टी घेऊन लांब ट्रिपची योजना आखू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
