होय, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आपल्या किचनमध्ये अशी एक वस्तू आहे. ती वस्तू म्हणजे भांडी घासण्याचा स्क्रबर किंवा स्पॉन्ज. हा स्क्रबर तुमची भांडी तर चमकावतो. मात्र त्याच्यामध्ये किती बॅक्टेरीया लपून बसलेले आहात. हे या आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. एका रिसर्चनुसार, भांडी घासण्याचा स्क्रबर एका टॉयलेट सीटपेक्षा 800 पट जास्त बॅक्टेरीया असू शकतात. याबद्दल itsprashantdesai या अकाऊंटवरून प्रशांत देसाई यांनी माहिती दिली आहे. चला पाहूया याची कारण आणि उपाय.
advertisement
स्क्रबर घाण होण्याची कारणं..
- आपण भांडी घसतो आणि त्यानंतर तो स्क्रबर पाण्याखाली धुवून सिंकजवळ ठेवतो. मात्र यामुळे तो पूर्णवेळ ओला राहतो आणि त्यामध्ये अन्नाचे लहान लहान अवशेष, तेलाचे स्निग्ध घटक तसेच अडकून राहतात.
- दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्क्रबर 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ वापरणे. अशा स्क्रबरमध्ये इ कोलाय, साल्मोनेला सारखे अनेक बॅक्टेरीया तयार होऊ लागतात.
- असा स्क्रब तुम्ही वारंवार वापरता, तेव्हा त्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोचण्याची शक्यता असते. मात्र यावर काही उपाय आहेत. थोडी खबरदारी घेतल्यास तुम्ही हे स्क्रबर वापरू शकता.
स्क्रबर वापरण्याची योग्य पद्धत..
- सर्वात पहिले तर जुने स्क्रबर घरातून काढून टाका. स्क्रबर 1 किंवा 2 आठवड्यांपेक्षा जास्तकाळ वापरू नये.
- प्रत्येक वापरानंतर स्क्रब पाण्याचे स्वच्छ धुवा आणि पिळून त्यातले संपूर्ण पाणी काढून तो कोरड्या जागी ठेवा.
- आठवड्यातून एकदा तो व्यवस्थित डिसइन्फेक्ट करा. यासाठी तो गरम किंवा उकाळ्यात पाण्यात काही काळ ठेवा. यामुळे स्क्रब पूर्णपणे स्वच्छ आणि बॅक्टेरीया फ्री होतो.
- जर तुमचा स्क्रब खराब दिसत असेल, तुटला-फाटला असेल किंवा चिकट लागत असेल तर तो ताबडतोब फेकून द्या.
बऱ्याचदा घरात आजारांचं कारण बाहेरच वातावरण किंवा अस्वस्थ जेवण नसतं, तर कधी कधी कारण हा अस्वच्छ स्क्रबसुद्धा असू शकतो. त्यामुळे योग्य स्वच्छता ठेऊन तुम्ही तुमच्या फॅमिलीचं आरोग्य सांभाळू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
