दमोह, 26 डिसेंबर : गोड पदार्थ कितीही आवडत असले तरीही चमचमीत मसालेदार पदार्थ पहिले की कोणाच्याही तोंडाला आपसूक पाणी येतं. जशी जेवणाला फोडणीशिवाय चव नसते, तशीच फोडणी हिंगाशिवाय अपूर्ण असते. त्यामुळे हिंग हा स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा पदार्थ आहे.
तुम्हाला माहितीये का, चिमूटभर हिंग जशी अन्नपदार्थांची चव वाढवतं, तसंच ते आरोग्यासाठीदेखील उपयुक्त असतं. आयुर्वेदात हिंगाचे फायदे सांगितलेले आहेत. त्यानुसार, हिंग मोठमोठ्या आजारांवर गुणकारी असतं. त्यामुळे जेवणात हिंगाचा आवर्जून वापर करण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय हिंगामुळे वजनही नियंत्रणात राहतं, तर वाढलेलं वजन कमी होण्यास मदत मिळते.
advertisement
तोंडाची दुर्गंधी होते कमी; जेवणातील लवंग बाजूला काढण्या आधी वाचा ‘हे’ फायदे
त्वचा रोग होतील दूर
हिंगाचा लेप बनवून त्वचेवर लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्वचारोग दूर होण्यास मदत मिळते. शिवाय हिंगात अँटीइंफ्लेमेटरी, अँटीबायोटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे जखमा भरून निघतात. तसंच रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
इथं मिळतो स्पेशल हलवा, खाऊन तोंड गोड नाही, होतं तिखट; कानातून येतो धूर!
आयुर्वेदिक डॉक्टर दीप्ती नामदेव सांगतात की, विशेषतः हिवाळ्यात हिंग सर्वाधिक फायदेशीर ठरतं. झाडाच्या मुळांमधून निघणाऱ्या दुधापासून ते तयार केलं जातं, ज्याचा वापर आपण अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी करतो.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g