जाणून घेऊयात तारामिरा किंवा जांभा तेलाचे फायदे
तारामिरा म्हणजे नेमकं काय ?
या तेलाला जांभा तेल किंवा अरुगुलाचं तेल असंही म्हणतात.अरुगुलाची पानं खाता येतात आणि त्याच्या बियांपासून तेलंही काढता येतं. हे तेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तारामिरा हा मोहरीचा एक प्रकार असून मोहरीप्रमाणे तारामिराचे दाणे असतात.
तारामिरा तेलाचे फायदे
advertisement
जांभा किंवा तारामिराच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉलेट, जीवनसत्व अ, आणि जीवनसत्व क, असतं. मात्र भारतात ही पानं खाल्ली जात नाहीत तर त्याचं तेल काढून वापरतात.
औषधी गुणधर्म
तारामिराच्या तेलात अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ज्यांना पुरळ, खाज किंवा अन्य त्वचाविकार आहेत त्यांच्यासाठी हे तेल फायदेशीर ठरतं. याशिवाय एखाद्या जखमेवर तारामिराचं तेल लावण्याने ती जखम लवकर भरून यायला मदत होते. तारामिरा तेलात दाहक विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे डोकेदुखी,अंगदुखी इत्यादी आजारांवर हे तेल गुणकारी ठरू शकतं. या तेलाने शरीराला मसाज केल्याने थकवा दूर होतो.
हे सुद्धा वाचा : Almond Oil चे फायदे माहीत आहेत का? त्वचाच नाही तर आरोग्यही सुधारेल
त्वचेसाठी फायद्याचं
तारामिरा तेलामध्ये अँटिमेलानोमा आणि अँटीम्युटेजेनिक गुणधर्म आहेत. यामुळे हे तेल शरीरावर लावल्यास कॅन्सरच्या पेशी तयार होत नाही. त्यामुळे त्वचेच्या कॅन्सरसारखे गंभीर आजार रोखण्यासाठी तारामिरा तेल फायद्याचं ठरतं. तारामिरा तेलाच्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे त्वचेचीजळजळ थांबू शकते. शिवाय हे तेल सोरायसिस सारख्या आजारांवर गुणकारी ठरतं. तारामिरा तेल लावल्यामुळे चेहऱ्यावरच्या मुरुमांची समस्या देखील दूर होऊ शकते.
केसांच्या वाढीसाठी फायदेशीर
कोंडा किंवा उवा लिखांच्या त्रासावर हे तेल गुणकारी ठरतं. मात्र या तेलाचा वापर करताना योग्य प्रमाणातच करण्याा सल्ला तज्ज्ञ देतात . शिवाय तेल लावल्यानंतर शॅम्पूने केस धुवायला विसरू नका.