काय आहे दावा आणि पथ्य?
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील क्लिनिकल असोसिएट प्रोफेसर डॉ. तामिको कात्सुमोतो म्हणतात की, ‘संधिवाताचं दुखणं हे जीवघेणं असतं. एकदा झालेला संधिवात पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र सांधेदुखीचा त्रास हा नक्कीच कमी होऊ शकतो. त्यासाठी फार विशेष काही करण्याची गरज नाहीये. अगदी आहारात थोडे बदल जरी केले तरी सांधेदुखी आणि गुडघेदुखीपासून आराम मिळू शकतो. यासाठी काही पदार्थ तुम्हाला दैनंदिन आहारातून कायमचे वर्ज्य करावे लागतील कारण संधिवात व्यवस्थापनात अन्नाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. याशिवाय नियमित व्यायाम सुद्धा तुम्हाला सांधेदुखीच्या दुखण्यापासून आराम देऊ शकतो.’
advertisement
‘हे’ अन्नपदार्थ टाळा, पळून जाईल संधिवात
डॉ. कात्सुमोतो सांगतात की, सर्वप्रथम अति-प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं बंद करा. रिफाइंड मैद्यापासून बनवलेल्या वस्तू, पॅकेज्ड फूड, याशिवाय चॉकलेट, पेस्ट्री सारखे गोड पदार्थ आहारातून काढून टाका. तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुम्हाला लाल मांस खाणं टाळावं लागेल. यामुळे युरिक ॲसिड वाढण्याचा धोका असतो. तुम्हाला संधिवाताचा त्रास कमी करायचा असेल किंवा लहान वयात संधिवात होऊ द्यायचा नसेल तर डाळी, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका भरड धान्याचा तुमच्या आहारात समावेश केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. यासोबतच जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. मात्र या हिरव्या पालेभाज्यांनी जास्त तळलेल्या किंवा जास्त शिजवलेल्या नसतील याची काळजी घ्य. शेंगांच्या भाज्या, कडधान्ये मसूर, विविध डाळी फ्लॉवर, कोबी, खाल्ल्याने संधिवाताचा त्रास दूर होऊ शकतो. काजू, बदामापासून सगळ्या प्रकारचे सुकामेवे हे संधिवातावर गुणकारी ठरू शकतात. तुम्ही जर मांसाहारी असाल तर मटणापेक्षा चिकन आणि मासे खाण्यावर भर द्या. चिकन खाल्ल्याने तुम्हाला प्रोटिन्स मिळतील. तर ट्यूना, सारर्डिन, सॅलमॅन सारखे मासे खाल्ल्याने संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. संधिवाताच्या वेदनांवर क्रूसिफेरस भाज्या सर्वोत्तम आहेत.
