भोगी हा हिवाळ्यातील शेवटच्या टप्प्याचा आणि नवीन ऋतूच्या स्वागताचा दिवस मानला जातो. या दिवशी जुन्या, नको असलेल्या वस्तू जाळून टाकतात. नवीनतेचा, स्वच्छतेचा आणि सकारात्मकतेचा स्वीकार करतात. तसंच यादिवशी निसर्गाने दिलेल्या पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच भावनेतून भोगीची भाजी बनवण्याची परंपरा सुरू झाली.
भोगीची भाजी म्हणजे नेमकं काय?
ही भाजी एका प्रकारची नसते, तर अनेक भाज्यांचा मेळ असतो. हिवाळ्यात मिळणाऱ्या अनेक ताज्या भाज्या एकत्र करून बनवलेली खास भाजी. का ठिकाणी याला सकळ भाजी, मिश्र भाजी, सणाची भाजी असंही म्हणतात.
advertisement
भोगीच्या भाजीत काय काय टाकतात?
भोगीच्या भाजीत परंपरेनुसार घरात उपलब्ध असलेल्या आणि हंगामी भाज्या टाकल्या जातात. जितक्या जास्त भाज्या, तितकी भाजी पवित्र अशीही धारणा आहे.
Tilgul Ladoo : कुकरच्या एका शिट्टीत बनवा मऊसूत तिळगूळ लाडू आणि तिळाची वडी
भोगीच्या भाजीत सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या भाज्या
गाजर
वाटाणा
वालाचे दाणे
हरभरा (ओला चणा)
पापडी
भेंडी
फ्लॉवर
कोबी
दोडका / घोसाळं
दुधी भोपळा
शेवगा शेंगा
बटाटा (काही ठिकाणी)
अनेक घरांमध्ये 12, 15 किंवा 18 भाज्या टाकण्याची परंपरा आहे.
चव आणि आरोग्य वाढवणारे घटक
हिरवी मिरची
आलं
लसूण
कोथिंबीर
ओलं खोबरं (काही घरांत)
हे घटक केवळ चवीसाठी नाहीत, तर पचन सुधारण्यासाठी देखील उपयुक्त असतात.
मसाले आणि फोडणी
भोगीची भाजी फार तिखट नसते. ती सौम्य, गोडसर आणि पचायला हलकी ठेवली जाते.
तेल
मोहरी
जिरे
हिंग
हळद
मीठ
थोडासा गूळ, ही भोगीची खास ओळख आहे. गुळामुळे भाजीला संतुलित गोड-तिखट चव येते आणि शरीराला उष्णता मिळते.
भोगीची भाजी कशी बनवतात?
साहित्य
सर्व भाज्या
तेल – 2 टेबलस्पून
मोहरी – 1 टीस्पून
जिरे – ½ टीस्पून
हिंग – चिमूटभर
हळद – अर्धा टीस्पून
हिरवी मिरची-आलं पेस्ट
मीठ – चवीनुसार
गूळ – छोटा तुकडा
कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती
सर्व भाज्या स्वच्छ धुवून मध्यम आकारात चिरून ठेवा. कढईत तेल गरम करा. मोहरी घालून तडतडू द्या. जिरे, हिंग, हळद घाला. हिरवी मिरची-आले पेस्ट घालून परतून घ्या. सर्व भाज्या एकत्र घालून नीट परतून घ्या. मीठ घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा. भाज्या मऊ झाल्यावर गूळ घाला. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
भाजी फार पातळ किंवा फार कोरडी नसावी. ही भाजी तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, भातासोबत खाऊ शकता. सोबत तोंडी लावायला तिळाची चटणी, लोणचं अशी जेवणाची थाळी हिवाळ्यासाठी अत्यंत पोषणमूल्यपूर्ण असते.
आरोग्यदृष्ट्या भोगीची भाजी का महत्त्वाची?
अनेक भाज्यांमुळे विविध जीवनसत्त्वे आणि खनिजं मिळतात, फायबरमुळे पचन सुधारतं, गूळ शरीराला उष्णता देतो, हिवाळ्यातील थकवा आणि सर्दी टाळण्यास मदत होते.
Tilgul Ladoo Recipe : पाक न करता, हाताला चटके न देता मऊसूद तिळगुळाचे लाडूची रेसिपी
भोगीची भाजी म्हणजे निसर्गाशी नातं, ऋतूचक्राचा आदर, कुटुंब एकत्र येण्याचा आनंद, आरोग्याची जाणीव. ही भाजी फक्त एक पदार्थ नाही, तर ती महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा आत्मा आहे. परंपरा जपताना आरोग्यही जपणारी ही भाजी प्रत्येक पिढीने अनुभवायला हवी.
