TRENDING:

Summer Drink : किंचितही साखर न वापरता बनवा उन्हाळ्यातलं 'हे' खास सरबत, दिवसभर तुमचं शरीर ठेवेल थंड!

Last Updated:

बऱ्याचशा सरबतांमध्ये साखर टाकलेली असते. त्याशिवाय आपल्याला सरबताची कल्पना करवत नाही. साखरेमुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी येते खरी पण नंतर त्यामुळेच लवकर सुस्तीही येते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात आपण अनेक प्रकारचे सरबत पितो. पण बऱ्याचशा सरबतांमध्ये साखर टाकलेली असते. त्याशिवाय आपल्याला सरबताची कल्पना करवत नाही. साखरेमुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी येते खरी पण नंतर त्यामुळेच लवकर सुस्तीही येते. म्हणूनच बिनसाखरेचं शरीराला हायड्रेट करणारं, एनर्जी देणारं आणि रिफ्रेश करणारं एखादं पेय असलं तर ते जास्त फायद्याचं होईल.
असं बनवा बडीशेपचं सरबत..
असं बनवा बडीशेपचं सरबत..
advertisement

असाच एक रिफ्रेशिंग सरबत कसं बनवायचं याबद्दल आयुर्वेद तज्ञ पुरुषार्थ पवन आर्य यांनी माहिती दिली आहे. त्यांच्यामते हे सरबत म्हणजे बडीशेपचं सरबत. कारण बडीशेपमध्ये थंडावा देणारे गुणधर्म असता. म्हणूनच उन्हाळ्यात बडीशेपचं सरबत आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. हे सरबत तुम्ही साखर आणि कोणत्याही महागड्या मसाल्यांशिवाय बनवू शकता. यामध्ये फक्त तीन मुख्य घटक वापरले जातात.

advertisement

बडीशेपच्या सरबताचे फायदे..

- आयुर्वेदानुसार, बडीशेप शरीरात उष्णता कमी करते. उन्हाळ्यात बडीशेप खाल्ल्याने शरीर आतून थंड होतं आणि उष्माघातापासून तुम्ही वाचू शकता.

- बडीशेप पचनसंस्था मजबूत करते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देते. हे सरबत तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवेल आणि दिवसभर फ्रेश ठेवेल.

- ज्या उन्हाळ्यात लोकांना अनेकदा गॅस, अपचन आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. बडीशेपचे सरबत या सर्व समस्यांपासून आराम देते.

advertisement

- बडीशेप पचनक्रिया सुधारते आणि पोटाला थंडावा देते.

- या सरबतांमध्ये वापरली जाणारी काळी मिरी पचनक्रिया संतुलित ठेवते, तर खडीसाखर ऊर्जा देते.

असं बनवा बडीशेपचं सरबत..

- बडीशेपचे सरबत बनवण्यासाठी, प्रथम बडीशेप आणि काळी मिरी पूर्णपणे स्वच्छ धुवा. नंतर हे 2 ते 3 तास ​​पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे बडीशेप मऊ होते आणि तिची चव पाण्यात उतरते.

advertisement

- भिजवण्याच्या प्रक्रियेमुळे बडीशेपमधील पोषक तत्वे देखील सक्रिय होतात, ज्यामुळे सरबत जास्त प्रभावी बनतं आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करतं.

- भिजवलेली बडीशेप त्याच पाण्यासोबत मिक्सरमध्ये टाका. नंतर त्यात खडीसाखर घालून ते चांगले बारीक करा. मिश्रणाची एक गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत ते ब्लेंड करा.

- यानंतर एका कापडातून किंवा गाळणीद्वारे हा रस गाळून घ्या. अशाप्रकारे सरबताचा एक्सट्रॅक्ट तयार होईल. हा एक्स्ट्रॅक्ट तुम्ही जो काही दिवसांसाठी फ्रिजमध्ये साठवू शकता.

advertisement

- सर्व्ह करण्यासाठी, एका ग्लास थंड पाण्यात तयार केलेल्या पेस्टचे 2 चमचे टाकून मिक्स करा. हवं असल्यास तुम्ही यामध्ये बर्फाचे तुकडेदेखील घालू शकता.

- काही क्षणांतच थंडगार बडीशेपचं सरबत तयार होईल. हे सरबत शरीराला त्वरित फ्रेश करतं आणि उष्माघातापासून आराम देतं. दिवसातून एकदा किंवा दोनदा हे प्यायल्यास उष्माघात टाळता येऊ शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
18 तीर्थांनी समृद्ध महाराष्ट्रातील गाव, देवांचा वाडा म्हणून आहे ओळख, जपलीये ऐतिहासिक परंपरा, Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Drink : किंचितही साखर न वापरता बनवा उन्हाळ्यातलं 'हे' खास सरबत, दिवसभर तुमचं शरीर ठेवेल थंड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल