डेन्मार्कमधील ही घटना आहे. एका व्यक्तीने नारळपाणी विकत घेतलं होतं. ते तो लगेच प्यायला नाही. फ्रिजमध्ये ठेवायलाही तो विसरला. त्याने ते बाहेर टेबलवरच ठेवलं. नंतर तो बाहेरून आला आणि ते नारळपाणी प्वियायला. काही वेळातच त्याला खूप घाम येऊ लागला, मळमळल्यासारखं वाटू लागलं, उलट्या होऊ लागल्या, चक्करसारखं वाटू लागलं.
बापरे! 30 लाख मुलांचा मृत्यू, औषधाचाही होत नाही परिणाम, कारण काय?
advertisement
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याला वाचवता आलं नाही. एमआरआय अहवालात असं दिसून आलं की त्याच्या मेंदूत गंभीर सूज होती, ज्यामुळे मेंदूला नुकसान झालं आणि त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी सांगितलं की याचं कारण नारळाच्या पाण्यात असलेली बुरशी होती, जी लवकर रक्तात पोहोचते आणि मेंदूला नुकसान पोहोचवते. त्या माणसाने आपल्या पत्नीला सांगितलं की नारळाच्या पाण्यात काहीतरी आहे, त्याचा वासही येत आहे. म्हणून तो थोडंसंच पाणी प्यायला. पण इतकंसंच पाणी त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं.
नारळ पाणी कसं प्यावं?
विशेषतः जर नारळाचं पाणी उघडलं असेल तर ते अजिबात पिऊ नका. बाजारातून पॅक केलेलं नारळ पाणी खरेदी करत असाल तर ते ताबडतोब फ्रीजरमध्ये ठेवा. जर तुम्ही ते जास्त काळ बाहेर ठेवलं तर त्यात बुरशी वाढण्याचा धोका जास्त असतो.
तुमचे कपडे तुमचं आयुष्य कमी करू शकतात, पण कसं काय?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की नारळाचं पाणी नेहमी गाळून ग्लासमध्ये प्यावं. यामुळे नारळाच्या पाण्यात बुरशी जाण्याचा धोका कमी होतो. बऱ्याच वेळा नारळाच्या पाण्यातील बुरशी आत गेल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो, काही प्रकरणांमध्ये ऍलर्जी देखील होऊ शकते परंतु जर बुरशी खूप धोकादायक आणि सक्रिय असेल आणि रक्तात कशी तरी प्रवेश करत असेल तर ती मेंदूपर्यंत पोहोचू शकते. म्हणून, नारळाचे पाणी कधीही गाळल्याशिवाय पिऊ नये.