तुळस -
आयुर्वेदात तुळशीला महत्त्वाचं स्थान आहे. ही वनस्पती विशेषतः रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, सर्दी-खोकला बरा करण्यासाठी ओळखली जाते. तुळस छोटं रोप लावून किंवा बियांपासून उगवता येते. रोप सकाळच्या सूर्यप्रकाशात ठेवा आणि या रोपाची माती नेहमी ओलसर ठेवा, पण जास्त पाणी घालणं टाळा. तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांद्यांचा, मंजिरीचा आणि खोडाचा वापर औषधी म्हणून करता येतो. ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. तसंच दातांचं आरोग्य जपण्यातही तुळस उपयुक्त आहे, दातदुखी, कमजोर हिरड्या, दातांतून रक्त येणं, दात किडणं यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो. तोंडातून दुर्गंधी येणं, चव नसणं, यांवर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचं सेवन करू शकता. तुळशीच्या पानांमधील पोषक तत्व तोंडात लपलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास प्रभावी ठरतात.
advertisement
रोपटं एक उपयोग अनेक: मसाल्यांच्या चवीबरोबर विविध आजारांवर प्रभावी औषध
खोकला-सर्दी
हिवाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकल्याची समस्या जाणवणं कॉमन आहे. अशा स्थितीत आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुळशीची पानं चघळलीत तर नक्कीच फायदा होईल. तुम्ही काढा किंवा चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करू शकता.
Dhataki Benefits: डायबेटीस, लिव्हर डीसिजसाठी रामबाण औषध आहे ही औषधी वनस्पती, महिलांसाठीही फायदेशीर
आलं
आलं पचन सुधारण्यास, जळजळ कमी करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते. आल्याची मुळं मसाल्यासाठी आणि औषधासाठी वापरली जातात. आल्याचे तुकडे जमिनीत २ ते ३ इंच खोल पेरा. आल्याचं रोप सावलीत ठेवा आणि नियमित पाणी द्या.
पुदिना
पोटाच्या समस्या आणि त्वचेसाठी पुदिना खूप फायदेशीर आहे. ही वनस्पती घरी सहज उगवता येते आणि चहा, कोल्ड्रिंक्स आणि सॅलडमध्ये वापरली जाऊ शकते आणि त्याचा वापर चहामध्येही केला जातो.