Dhataki Benefits: डायबेटीस, लिव्हर डीसिजसाठी रामबाण औषध आहे ही औषधी वनस्पती, महिलांसाठीही फायदेशीर
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
झुडपासारखं छोटं झाड असतं आणि देठविरहीत पानं असतात. झाडांच्या पानांचा आणि फुलांचा औषध म्हणून वापर होतो. या औषधीचा वापर केल्यानंतर काही गंभीर आजारांवरही नियंत्रण मिळवता येते, असं आयुर्वेद सांगतो.
आशीष त्यागी
बागपत (उत्तर प्रदेश) : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी औषधांसोबतच काही औषधींचा वापरही खूप प्रभावी ठरतो. अशाच एका औषधीचे नाव आहे धायटी. याला संस्कृतमध्ये धातकी असं नाव आहे. इंग्रजीत याला Woodfordia Fruticosa असं नाव आहे आणि हिंदीतही Dhataki धाकती या नावाने ही औषधी वनस्पती परिचित आहे. धायटीची झाडं देशभरात सगळीकडे आढळतात. झुडपासारखं छोटं झाड असतं आणि देठविरहीत पानं असतात. जानेवारीपासून तीन-चार महिने झाडाला लाल रंगाची फुलं येतात. ती गुच्छासारखी असतात. या झाडांच्या पानांचा आणि फुलांचा औषध म्हणून वापर होतो. या औषधीचा वापर केल्यानंतर काही गंभीर आजारांवरही नियंत्रण मिळवता येते, असं आयुर्वेद सांगतो. चला, जाणून घेऊया या औषधीचे फायदे आणि आरोग्यावर होणारे परिणाम.
advertisement
धायटीचे फायदे
धायटी औषध डायबिटीज आणि पोटाच्या समस्या कमी करून शरीराला ताकद देण्याचे काम करते. या औषधीचा वापर केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. शरीरात चमत्कारिक बदल घडवून आणणारी ही औषध आहे.
गंभीर आजारांसाठी उपयोगी
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सरफराज अहमद यांच्या मते, धायटी एक चमत्कारिक आयुर्वेदिक औषध आहे. याचा वापर शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य आजारांवर केला जातो. याचा उपयोग करून गंभीर आजारांवरही नियंत्रण मिळवता येते. डोळे, नाक आणि घशाच्या समस्यांवरही हे औषध खूप प्रभावी आहे.
advertisement
त्वचा आणि लिव्हरसाठी फायदेशीर
धायटीचे सेवन केल्याने लिव्हर आणि त्वचेशी संबंधित आजारांवरही नियंत्रण मिळवता येते. त्वचेच्या समस्यांवरही हे औषध त्वरित आराम देते. महिलांसाठी गर्भधारणेसाठीही हे औषध उपयोगी ठरते.
धायटीचा वापर कसा करावा?
डॉ. सरफराज अहमद यांनी सांगितले की, धायटीचा वापर चूर्णाच्या स्वरूपात केला जातो. हे चूर्ण दूध किंवा पाण्यासोबत घेतले जाते. शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य वापरासाठीही हे औषध प्रभावी ठरते. शरीराला ताकद देण्याबरोबरच ते शरीराला चमकदार बनवण्याचे काम करते.
advertisement
Disclaimer: या बातमीत दिलेला उपाय/औषध आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ज्ञांशी झालेल्या संभाषणावर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच एखादी गोष्ट वापरा. कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या नुकसानीस Local18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Baghpat,Uttar Pradesh
First Published :
September 16, 2024 6:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dhataki Benefits: डायबेटीस, लिव्हर डीसिजसाठी रामबाण औषध आहे ही औषधी वनस्पती, महिलांसाठीही फायदेशीर