TRENDING:

शेवटी देवच ते! रुग्णाचा हात पूर्ण तुटला, डॉक्टरांनी तो जसाच्या तसा पुन्हा जोडला

Last Updated:

कुटुंबियांनी प्रसंगावधानता दाखवून त्याचा तुटलेला हात बर्फात पॅक करून रुग्णालयात नेला. त्यामुळे तो सुस्थितीत राहिला आणि पुन्हा जोडता आला, असं डॉक्टर म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिदानंद, प्रतिनिधी
रात्रभर ही शस्त्रक्रिया चालली.
रात्रभर ही शस्त्रक्रिया चालली.
advertisement

पाटणा : डॉक्टरांना देव मानतात ते काही उगीच नाही. आपल्या रुग्णांचा जीव वाचवून, त्यांना सुदृढ आयुष्य देऊन ते कायम प्रामाणिकपणे त्यांचं कार्य बजावतात. आता तर डॉक्टरांनी चक्क अख्खा हात पुन्हा जोडून एका व्यक्तीला नवीन जीवन दिलंय. या तरुणाला पूर्णपणे बरं व्हायला 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागेल, त्यानंतर तो अगदी सामान्य आयुष्य जगू शकेल.

advertisement

बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये डॉक्टरांनी विज्ञान क्षेत्रातला हा चमत्कार घडवला. कदमकुआं दलदली रोड भागात राहणाऱ्या संतोष कुमार या 30 वर्षीय तरुणाचा उजवा हात तेलाच्या मशीनमध्ये अडकला होता. त्याने हात बाहेर काढण्याचा जीवापाड प्रयत्न केला, मात्र त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि त्याचा अर्धा हात शरिरापासून वेगळा झाला.

हेही वाचा : पुणे तिथे काय उणे...वकील तरुणाने पाळल्या गायी, मॉलमध्येही घेऊन जातो फिरायला

advertisement

संतोषचा हात जेव्हा मशीनमध्ये अडकला होता, तेव्हाच त्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. जेव्हा हात पूर्णपणे तुटला, तेव्हा त्याच्या शरिरातून भरपूर रक्त वाहिलं आणि तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. हे सर्व दृश्य पाहून त्याचे कुटुंबीय प्रचंड घाबरले, त्यांनी त्याला तसंच उचललं आणि रुग्णालयात नेलं. तसंच त्यांनी प्रसंगावधानता दाखवून त्याचा तुटलेला हातही बर्फात पॅक करून रुग्णालयात नेला. तिथे हड्डी रोग विशेषज्ञ डॉ संजय कुमार यांनी संतोषला तपासलं.

advertisement

संध्याकाळी साधारण 7 वाजता संतोषचा हात तुटला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी करून रात्री 11 वाजताच्या दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू केले. रात्रभर ही शस्त्रक्रिया चालली. सकाळी 7 वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाली. संतोषचा हात डॉक्टरांनी यशस्वीरीत्या जोडला. ही शस्त्रक्रिया जवळपास अशक्य होती, मात्र हड्डी रोग विशेषज्ज्ञ डॉ. संजय कुमार, प्लॅस्टिक सर्जन डॉ. प्रियदर्शी रंजन आणि अ‍ॅनेस्थेशियॉलॉजिस्ट डॉ. राजीव रंजन यांनी ती शक्य करून दाखवली.

advertisement

हेही वाचा : तब्बल 6 शासकीय नोकऱ्या मिळवत कुंभार कन्येने दिला जीवनाला आकार, पाहा यशाची कहाणी

डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं की, तरुणाचा हात जेव्हा शरिरापासून वेगळा झाला तेव्हा तो निळा पडायला लागला होता. स्पर्श करताच थंड लागत होता. त्यामुळे आम्ही तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे. हात जोडल्यानंतर काही वेळातच रक्तप्रवाह सुरू झाला, हात लालसर दिसू लागला आणि स्पर्श करताच उब येऊ लागली. तर, प्लॅस्टिक सर्जन डॉ. प्रियदर्शी रंजन यांनी सांगितलं की, रुग्णाच्या हातातला रक्तप्रवाह सुरळीत झाला असला, तरी त्याच्या पूर्ण हाताची, बोटांची हालचाल पूर्ववत व्हायला आणखी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागेल. तसंच त्यांनी संतोषच्या कुटुंबियांचं कौतुक केलं. त्यांनी हात बर्फात आणल्याने तो सुस्थितीत राहिला आणि तोच हात पुन्हा जोडणं शक्य झालं.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा 

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शेवटी देवच ते! रुग्णाचा हात पूर्ण तुटला, डॉक्टरांनी तो जसाच्या तसा पुन्हा जोडला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल