तब्बल 6 शासकीय नोकऱ्या मिळवत कुंभार कन्येने दिला जीवनाला आकार, पाहा यशाची कहाणी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालन्यातील अश्विनी मोटारकर या कुंभार कन्येने मडक्याप्रमाणेच स्वतःच्या जीवनाला देखील आकार देत तब्बल सहा शासकीय नोकऱ्या मिळवल्या आहेत.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : ओल्या मातीला आकार देऊन अत्यंत आकर्षक मडके घडवण्याचं काम कुंभार समाज हा पिढ्या-पिढ्यांपासून करत आला आहे. अत्यंत मागास असलेला हा समाज आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही. मात्र, जालन्यातील अश्विनी मोटारकर या कुंभार कन्येने मडक्याप्रमाणेच स्वतःच्या जीवनाला देखील आकार देत तब्बल सहा शासकीय नोकऱ्या मिळवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वतः दिवाळीच्या पणत्या आणि मडके विकण्याचे काम करणाऱ्या अश्विनीचा हा संघर्षमय प्रवास कसा झाला पाहूया.
advertisement
कसं मिळवलं यश?
अश्विनी मोटारकर ही मूळची जालना जिल्ह्यातील घेटुळी या गावची रहिवाशी आहे. अश्विनीला एकूण चार बहिणी असून घरची परिस्थिती ही अत्यंत नाजूक मात्र दहावीच्या परीक्षेत अश्विनीला 91 टक्के मार्क मिळाले आणि अश्विनीची शिक्षणातील चुणूक तिचा मावस भाऊ असलेल्या सुनील सुरकुंडे यांनी ओळखली. अश्विनीच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन त्यांनी अश्विनीला माझ्याकडे राहू द्या आम्ही हिच्या शिक्षणाचा खर्च करतो असं सांगून जालन्याला घेऊन आले.
advertisement
मित्रांनी काढलं Depression मधून बाहेर, अन् त्यानं मिळवलं अत्यंत कठीण परीक्षेत यश, तरुणाची प्रेरणादायी गोष्ट
दहावीनंतरचे सगळे शिक्षण अश्विनीने जालन्यातच घेतले. अकरावीला कॉमर्सला अॅडमिशन घेऊन तिचा जालन्यातील प्रवास सुरू झाला. बीकॉमच्या द्वितीय वर्षाला असताना तिने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. द्वितीय वर्षाला असतानाच एमपीएससी प्रीलिम्स पास झाल्यानंतर तिचा आत्मविश्वास हा वाढला. मात्र पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे ती पुढे पात्र नाही झाली. यानंतर मात्र वेगवेगळे शासकीय फॉर्म सुनील सुरकुंडे भरत गेले आणि अश्विनी वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा देत गेली.
advertisement
आतापर्यंत अश्विनीला तब्बल सहा ठिकाणी शासकीय नोकऱ्यांच्या ऑफर आहेत. यामध्ये लोवर स्टेनोग्राफर, वैद्यकीय महाविद्यालयात लिपिक, तलाठी भरती परीक्षा, जालना जिल्हा परिषद लेखा विभागात कनिष्ठ सहायक, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे टायपिस्ट आणि जालना जिल्हा परिषदेसाठी स्टेनोग्राफर अशा सहा ठिकाणी तिला नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. सध्या ती बारामती येथे लोवर स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत असून अन्य नोकऱ्या सोडण्याचा निर्णय तिने घेतला आहे. आणखी अभ्यास करून मोठ्या पदाला जाण्याचे तिचे स्वप्न आहे.
advertisement
मत्स्य व्यवसायाच्या शिक्षणानंतर या आहे करिअरच्या संधी, कोल्हापुरातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
परिस्थिती आणि उन असे दोन्ही प्रकारचे चटके अश्विनीहिने सहन केले. याचबरोबर नातेवाईकांचे टोमणे आणि शिक्षणाला विरोध ही तिच्या वाट्याला आला. मात्र, तरीही डगमगून न जाता तिने अभ्यास सुरूच ठेवून तब्बल सहा नोकऱ्या मिळवण्याचे यश पदरात पाडून घेतलं. या यशाने तिची आई-वडील नातेवाईक अत्यंत खुश असून आई-वडील आणि मावस भाऊ सुनील सुरकुंडे तसेच मिस्टर सचिन गोडबोले यांनी केलेल्या मदतीमुळेच तसेच पाठिंबामुळेच आपण हे शिखर सर करू शकलो, अशी भावना अश्विनी व्यक्त करते. गाव खेड्यात राहणाऱ्या मुलींनी देखील खचून न जाता शिक्षणाची कास धरावी आणि आई-वडिलांनी ही त्यांना सपोर्ट करावा अशी भावना देखील तिने बोलून दाखवली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
May 04, 2024 12:11 PM IST