अगरबत्तीच्या रिकामा बॉक्सचा अनोखा असा वापर एका महिलेने दाखवला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा का तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर त्यानंतर चुकूनही अगरबत्तीचा बॉक्स फेकणार नाही. आता अगरबत्तीच्या रिकाम्या बॉक्सचा असा काय फायदा आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
अगरबत्तीच्या रिकामा बॉक्सचं करायचं काय?
अगरबत्तीचा रिकामा बॉक्स घ्यायचा आणि त्याला मध्ये फक्त एक कट मारायचा. म्हणजे या बॉक्सचे तुम्हाला 2 किंवा 3 तुकडे करायचे आहेत. ते नीट दुमडून तुम्हाला कपाटात ठेवायचे आहेत. कपाटातील एका कोपर्यात हा बॉक्स ठेवा. जो वर्षभरही तुम्ही तिथेच ठेवू शकता, जो बिलकुल खराब होणार नाही. असं महिलेने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
advertisement
पावसात याचा फायदा काय?
पावसाळ्यात बर्याच समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे ओलाव्यामुळे येणारा कुबट वास. अगदी बंद कपाट उघडलं तरी त्यातून असा कुबट वास येतो. पण जर का अगरबत्तीचा रिकामा बॉक्स तुम्ही कपाटात ठेवलात तर कुबट वास नाही तर अगरबत्तीचा सुगंध येईल. कारण अगरबत्तीच्या बॉक्सला अगरबत्तीचा सुगंध असतो. तुम्ही हा बॉक्स बेडखालीसुद्धा ठेवू शकता. म्हणजे बेडलाही वास येणार नाही.
इथं पाहा व्हिडिओ
यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
(सूचना : हा लेख सोशल मीडिया वरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. )