फक्त मच्छरच नाही तर मॉक्सिटो रिपेलंट आहेत धोकादायक
एकीकडे थंडीमुळे मच्छरांचा उद्रेक वाढला असताना, दुसरीकडे राज्यात झिका व्हायरच्या रूग्णांमध्येही वाढ झालीये. सहाजिकच मॉक्सिटो रिपेलंट म्हणजेच मच्छर मारणाऱ्या औषधांचा आणि मशिनचा वापर वाढलाय. टिव्ही दिसत असलेल्या जाहिरातींमध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्ही सुद्धा जर मॉक्सिटो रिपेलंट वापरत असाल तर सावधान. कारण हे मॉक्सिटो रिपेलंट तुमच्यासाठी मेंदूविकार आणि कॅन्सरचं कारण ठरू शकतात.
advertisement
धोकादायक केमिकल्स
सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या मॉक्सिटो रिपेलंटमध्ये अनेक केमिकल्सचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर जरी करत असल्या तरीही सिट्रोनेलोल आणि डायमिथाइल ऑक्टाइन आणि गंधहीन केरोसिन आणि पायपिरीटोन ऑक्साईड हे सहजपणे वापरलं जातं. पायपिरीटोन ऑक्साईडचं प्रमाण तर जवळपास 40 टक्क्यांपर्यंत असतं. याशिवाय मॉक्सिटो रिपेलंट सुगंधी बनवण्यासाठी ट्रांसफ्लुएंट, ब्यूटाइलेटेड हायड्रॉक्सीटोल्यूइन अशी अनेक सुगंधी रसायने यासाठी वापरली जातात. सततच्या वापरामुळे हे मॉक्सिटो रिपेलंट आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. कारण या केमिकल्समुळे श्वसनासंबंधी त्रास, सर्दी, खोकला, त्वचेचे आजार वाढू शकतात. जर तु्म्ही घरातील खिडक्या , दरवाजे बंद करून याचा वापर करत असाल तर हे अधिकच धोकादायक ठरू शकतं. कारण हे सगळे केमिकल्स कार्सिनोजन कॅटेगरी 2 च्या यादीतले आहेत. ज्यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो.
गरोदर स्त्रियांनी टाळावा वापर
गरोदर स्त्रियांकरिता हे फारच हानिकारक ठरू शकतं. या केमिकल्सच्या वासाचा परिणाम पोटातील बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आणि मेंदूवर होऊ शकतो. तुमच्या घरात जर पाळीव प्राणी असतील तर त्यांनाही याचा धोका आहे. सुगंधित रसायनांमुळे फुप्फुसांचा आजार होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे त्वचेते आजार देखील होऊ शकतात.
त्यामुळे फक्त मच्छरच नाही तर मच्छर मारणारे मॉक्सिटो रिपेलंटदेखील तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.