1. आवळा-
आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्याचा आहारात समावेश करून तुम्ही केस पांढरे होण्यापासून रोखू शकता. आवळ्यामुळे केसांसाठी आवश्यक मेलानिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं.
Benefits of Walnuts : तब्येत तंदुरुस्त ठेवण्यासाठी खा अक्रोड, आरोग्यासाठी आहे फायदेशीर
2. गव्हांकुराचा रस-
पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गव्हांकुराचा रस घेऊ शकता. गव्हांकुर पौष्टिक आहेत आणि केसांच्या वाढीसाठी पोषक तत्त्वं त्यात आहेत.
advertisement
3. गाजर-
हिवाळ्यात मिळणारी ताजी गाजरं आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. गाजरात असलेले गुणधर्म केस पांढरे होण्यापासून रोखू शकतात.
Hair Care : गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय, घरीच तयार करा हे मिश्रण, तेलात मिसळून लावा..केसगळती थांबेल
4. अश्वगंधा-
अश्वगंधाचं सेवन शरीर निरोगी ठेवण्यासाठीच नाही तर केस काळे होण्यासही उपयुक्त आहे. अश्वगंधाची पावडर दुधासोबतही पिऊ शकता.
आहारात काही मोठे बदल करण्याआधी आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.