TRENDING:

Skin Care : मुलायम चेहऱ्यासाठी वापरा शेवग्याच्या झाडाची पानं, जाणून घ्या कसा करायचा वापर, चेहरा दिसेल फ्रेश

Last Updated:

मोरिंगा म्हणजेच शेवगा त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. मुरुमं, सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुरुमांमुळे चेहऱ्यावर डाग राहतात. यासाठी एक सोपी युक्ती. शेवग्याची शेंग आवडीनं खाल्ली जाते. त्याच बहुपयोगी अशी शेवग्याच्या झाडांची पानं वापरु चेहऱ्यासाठी दोन तीन प्रकारचे फेस पॅक बनवू शकतो.
News18
News18
advertisement

मोरिंगा फेसपॅक बनवण्यासाठी, एका वाटीत मोरिंगा पावडर, दही, मध आणि गुलाबजल घाला, हे चांगलं मिसळून घ्या. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि दहा-पंधरा मिनिटं सुकू द्या. नंतर, स्वच्छ पाण्यानं धुवा. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरून पाहू शकता.

Holi Preparation : धुळवडीची तयारी झाली का ? वाचा खास होळी स्किन केअर टिप्स

advertisement

मोरिंगा म्हणजेच शेवगा त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. मुरुमं, सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

वर सांगितलेल्या फेसपॅक बरोबरच मोरिंगा पावडर आणि हळद वापरुन तसंच मोरिंगा पावडर, मध आणि कोरफड वापरुनही हे पॅक बनवता येतात. या पावडरमुळे आणि इतर नैसर्गिक घटकांमुळे चेहऱ्यावरचा कोरडेपणा जातो, कारण यानं त्वचेचं खोलवर हायड्रेशन होतं.

advertisement

Women Health : संकोच ठरतोय महिलांसाठी घातक, स्त्रियांच्या आरोग्याचं दाहक वास्तव

हे फेसपॅक, सुरकुत्या कमी करण्यासाठी, डाग घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

सुरकुत्या - मोरिंगामधे भरपूर अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

डाग - मोरिंगा फेस पॅकमधील गुणधर्मांमुळे मुरुमं कमी करण्यासाठी आणि डाग काढून टाकण्यासाठी मदत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडगार पाण्यासाठी माठ कसा निवडायचा? काळा की लाल चांगला कोणता?
सर्व पहा

त्वचा - मोरिंगा म्हणजेच शेवग्यामुळे नैसर्गिकरित्या कोलेजन उत्पादन वाढतं, यामुळे त्वचा डागरहित होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : मुलायम चेहऱ्यासाठी वापरा शेवग्याच्या झाडाची पानं, जाणून घ्या कसा करायचा वापर, चेहरा दिसेल फ्रेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल