Holi Preparation : धुळवडीसाठी दोन दिवस आधीपासूनच घ्या त्वचेची काळजी, होळी-धुळवडीसाठी खास सुरक्षा कवच
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
घरोघरी खास पदार्थांची तयारी सुरु आहे. तुम्ही पण धुळवडीची तयारी करत असाल तर इथल्या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आजकाल, रासायनिक रंगांचा वापर वाढलाय. रंगांचा वापर आपल्या त्वचेचं सर्वात जास्त नुकसान करतो. त्यामुळे धुळवड खेळताना त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे.
मुंबई : होळी आणि धुळवडीची तयारी घराघरात सुरु आहे. बाजारपेठांमधे विविध रंग, पिचकाऱ्या, फुगे, कपडे अशा सगळ्या वस्तूंची रेलचेल पाहायला मिळते आहे.
घरोघरी खास पदार्थांची तयारी सुरु आहे. तुम्ही पण धुळवडीची तयारी करत असाल तर इथल्या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आजकाल, रासायनिक रंगांचा वापर वाढलाय. रंगांचा वापर आपल्या त्वचेचं सर्वात जास्त नुकसान करतो. त्यामुळे धुळवड खेळताना त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे.
मॉइश्चरायझर - मॉइश्चरायझर वापरत असलात तरी, होळीच्या रंगांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी, झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम लावा. यामुळे त्वचा मऊ राहिल. त्वचा जितकी मऊ आणि जास्त हायड्रेटेड असेल तितकं धुळवडीनंतर रंग काढणं सोपं होईल.
advertisement
हायड्रेशन - त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी पाणी व्यवस्थित पिणं आवश्यक आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि रंगांमधील रसायनं त्वचेत जाण्यापासून रोखण्यासाठी दिवसातून किमान आठ-दहा ग्लास पाणी प्यायला सुरुवात करा.
फेशियल आणि ब्लीच - धुळवडीच्या दोन दिवस आधीपासून म्हणजे आजपासून कोणतंही फेशियल, क्लिन-अप किंवा ब्लीचिंग ट्रीटमेंट टाळा. या ट्रीटमेंटमुळे त्वचेचा संरक्षणात्मक थर काढून टाकला जाण्याची आणि त्यामुळे त्वचा संवेदनशील होऊ शकते. होळीच्या आधी फेशियल केलं तर रंग त्वचेत खोलवर जाऊ शकतात आणि त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
नखांची काळजी - रंग नखांना आणि आजूबाजूच्या त्वचेला चिकटून राहतात, बहुतेकदा कित्येक आठवडे तसेच राहतात. हे टाळण्यासाठी, नखं कापा आणि गडद रंगाचं नेल पेंट लावा. नखांच्या कोपऱ्यांवर थोडंसं व्हॅसलीन किंवा मोहरीचं तेल लावू शकता.
सनस्क्रीन - सूर्यप्रकाश आणि रंगांमुळे त्वचा काळवंडू शकते. म्हणून, तेल लावल्यानंतर, चांगल्या दर्जाचं सनस्क्रीन लावा.
advertisement
केस - धुळवड खेळण्यापूर्वी केसांना तेल लावा आणि वेणी घाला. ज्यामुळे केसांमधे रंग अडकणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 4:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Holi Preparation : धुळवडीसाठी दोन दिवस आधीपासूनच घ्या त्वचेची काळजी, होळी-धुळवडीसाठी खास सुरक्षा कवच