advertisement

Women Health : भारतातल्या सत्तर टक्के महिला करतात आरोग्याकडे दुर्लक्ष, तक्रारींबद्दल संकोच न वाटू देता घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

Last Updated:

भारतात, सत्तर टक्क्यांहून अधिक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी स्त्रीरोगविषयक समस्या येतात, पण जागरूकता आणि वेळेवर तपासणीच्या अभावामुळे अनेक प्रकरणांचं निदान होत नाही.

News18
News18
मुंबई : रोजच्या आयुष्यातल्या आव्हानांचा पाठलाग करताना दमल्यामुळे, अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि त्याचं प्रमाणही वाढतंय, त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची.
पुरुष आणि महिला दोघांनाही विविध आव्हानांना तोंड द्यावं लागतंय. अनेकदा तब्येतीच्या तक्रारी जाणवतातच त्यामुळे महिलांनी त्या सहन कराव्यात अशी अपेक्षा असते. मासिक पाळीचे वेदनादायक दिवस, PCOS, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस किंवा वारंवार होणारे संसर्ग हे लाखो महिलांसाठी रोजचं वास्तव आहे.
पाळी म्हणजे वेदना होणं, जास्त रक्तस्त्राव, अचानक वजन वाढणं, केस गळणं किंवा ओटीपोटात वेदना होणं ही लक्षणं गृहित धरलं जातं पण त्यामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष दिलं जात नाही.
advertisement
बऱ्याचदा, या सगळ्यावर न बोलणं हे संगोपन आणि संकोच यामुळे होतं. मासिक पाळी किंवा योनीच्या आरोग्याबद्दल उघडपणे चर्चा करणं अनेकदा लज्जास्पद वाटतं. आपल्याला जाणवणाऱ्या त्रासाकडे गांभीर्यानं पाहिलं जाणार नाही अशी भीती महिलांना वाटते. दुर्दैवानं, असंच घडतं.
advertisement
ग्रामीण भागात आणि लहान शहरांमधे स्त्रीरोग तज्ज्ञांची उपलब्धता मर्यादित असते, तर शहरांमधे व्यस्त जीवनआणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
हा त्रास सहन करणाऱ्या लाखो नाही कोट्यवधी महिला आहेत. भारतात, सत्तर टक्क्यांहून अधिक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी स्त्रीरोगविषयक समस्या येतात, पण जागरूकता आणि वेळेवर तपासणीच्या अभावामुळे अनेक प्रकरणांचं निदान होत नाही.
advertisement
मासिक पाळीतल्या आरोग्याबद्दल सजग राहा. नियमित आणि सहन करण्यायोग्य मासिक पाळी सामान्य आहे, पण दर तासाला पॅड बदलण्याची गरज, मोठ्या गुठळ्या होणं किंवा सात दिवसांपेक्षा जास्त काळ रक्तस्त्राव होणं अशी लक्षणं असतील तर चाचणीची आवश्यकता आहे असा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिला आहे.
या दिवसात, चांगली स्वच्छता पाळा, पण स्वच्छतेसाठी जास्त रासायनिक उत्पादनांचा वापर टाळा, कारण योनीमधे स्वतःला स्वच्छ ठेवण्याची क्षमता असते. तसंच जीवनशैलीचा विचार करणंही महत्त्वाचं आहे.
advertisement
पोषण आणि वजन हे संप्ररेकांच्या संतुलनाशी निगडित आहे. लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं असलेला पोषक आहार घेणं यासाठी आवश्यक आहे. जास्त वजन किंवा कमी वजनामुळे PCOS आणि वंध्यत्व यासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते.
advertisement
महिलांनी नियमितपणे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांनी शिफारस केल्यानुसार एचपीव्ही लस घ्यावी. मानसिक आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण ताण आणि झोपेची कमतरता मासिक पाळीवर थेट परिणाम करू शकते. जीवनशैलीत बदल केले आणि तुमच्या आरोग्याकडे बारकाईनं लक्ष दिलं तर गंभीर आजार टाळता येऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : भारतातल्या सत्तर टक्के महिला करतात आरोग्याकडे दुर्लक्ष, तक्रारींबद्दल संकोच न वाटू देता घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement