दातांवरचा पिवळेपणा दूर करण्यासाठी, बाजारातल्या उत्पादनांआधी घरगुती उपचार हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. विशेषतः नारळ तेल आणि कडुनिंबाच्या काड्यांचा वापर करुन पाहा. यामुळे दात स्वच्छ पांढरे आणि निरोगी दिसतील.
तुमचं हास्य जेवढं चांगलं, तितकं तुमचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं. पांढऱ्या आणि चमकदार दातांमुळे चेहरा प्रसन्न दिसतो. पण दात पिवळे झाले तर ते चेहऱ्याचं सौंदर्य खराब होतंच आणि आत्मविश्वासही कमी होतो.
advertisement
दात पिवळे होण्याची अनेक कारणं असू शकतात...काही वेळा जास्त चहा-कॉफी पिणं, अति तंबाखू खाणं, खाण्याच्या वाईट सवयी किंवा दात व्यवस्थित न घासणं ही त्यातली प्रमुख कारणं.
Rose Water : गुलाबपाण्याचे फायदे - तोटे, वापरण्याआधी या टिप्स जरुर वाचा
दात पांढरे शुभ्र करण्यासाठी काही घरगुती उपाय कामी येतील -
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस - एक दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. टूथब्रशनं दातांवर हलकं घासून नंतर धुवा. आठवड्यातून एक-दोन वेळा वापरल्यानं दात चमकू लागतात. पण याचा वापर जास्त केल्यानं लिंबाच्या आम्लानं दातांची हानी होऊ शकते.
हळद, मोहरीचं तेल आणि मीठ - नैसर्गिकरित्या दात पांढरे ठेवण्यासाठी एक चतुर्थांश चमचा हळद, थोडंसं मोहरीचं तेल आणि चिमूटभर मीठ मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण दात आणि हिरड्यांवर एक-दोन मिनिटं चोळा. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि हिरड्या मजबूत होतात.
Skin Care : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा तूप, वाचा गुणकारी तुपाचे आरोग्यदायी फायदे
एपल सायडर व्हिनेगर - हा पिवळ्या दातांसाठी घरगुती उपाय आहे. एक कप पाण्यात एक चमचा एपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि धुवा. ब्रशवर थोडं व्हिनेगर लावू शकता आणि ते दातांवर घासू शकता, पण आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा याचा वापर करू नका.
कोकोनट ऑईल पुलिंग - ही सर्वात प्रभावी आणि सुरक्षित पद्धत मानली जाते. एक चमचा नारळ तेल तोंडात ठेवा आणि ते 10-15 मिनिटं तोंडात फिरवा आणि नंतर ते थुंकून टाका. यानंतर, दात घासून घ्या. यामुळे दात नैसर्गिकरित्या स्वच्छ राहतात आणि जीवाणूही मरतात.