Skin Care : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा तूप, वाचा गुणकारी तुपाचे आरोग्यदायी फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
भारतात तूप नेहमीच आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना मानलं गेलं आहे. आयुर्वेदात त्याला अमृत म्हटलं आहे. तूप खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा वाढते. तूप त्वचेवर लावल्यानं चेहऱ्याच्या अनेक समस्या कमी होतात.
मुंबई : आपल्या देशाताल्या आहारात दूध - तूप असतंच. दिवसाच्या सुरुवातीला दूध, जेवणात तूप असतं कारण भारतात तूप नेहमीच आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना मानलं गेलं आहे. आयुर्वेदात त्याला अमृत म्हटलं आहे. तूप खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा वाढते. तूप त्वचेवर लावल्यानं चेहऱ्याच्या अनेक समस्या कमी होतात.
विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर तूप लावलं तर ते त्वचेसाठी जादूसारखं काम करतं. चेहऱ्यावर तूप लावण्याचे फायदे पाहूया. आजी - पणजीच्या काळापासून पचनापासून त्वचेपर्यंतच्या विकारांवर तूप हा रामबाण उपाय आहे. काही लागलं की आजी - पणजी अशाच घरच्या उपायांचा वापर सर्वात आधी करत होत्या.
advertisement
कोरड्या त्वचेपासून मुक्तता
काहींची त्वचा नेहमीच कोरडी आणि निर्जीव असते, त्यांच्यासाठी तूप वरदान आहे. यातील फॅटी अॅसिड त्वचेत खोलवर जातात आणि ती बराच काळ मॉइश्चरायझ ठेवतात.
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी उपयुक्त
तुपात असलेली जीवनसत्त्व आणि पोषक घटक त्वचेला आतून पोषण देतात. यामुळे चेहरा हायड्रेटेड राहतोच आणि त्यावर नैसर्गिक चमक येते. म्हणूनच आपली आजी, पणजी नेहमीच त्वचेवर तेला तुपाचा हात फिरवत असत.
advertisement
सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणं कमी करण्यासाठी उपयुक्त -
तुपात असलेली जीवनसत्त्वं ए, डी आणि ई त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात. यामुळे कोलेजनचं उत्पादन वाढवण्यासाठी मदत होते. ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा हळूहळू कमी होतात. यासाठी झोपण्यापूर्वी तूप लावू शकता.
चेहऱ्यावरच्या डागांपासून मुक्तता मिळवण्यासाठी उपयुक्त -
चेहऱ्यावरचं रंगद्रव्य किंवा डागांचा त्रास होत असेल तर रात्री तूप लावण्याची सवय लावा. यामुळे त्वचेचा रंग एकसारखा होतो आणि चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसतो. तूप हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
advertisement
काळ्या वर्तुळांचं प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त -
डोळ्यांखाली थोडंसं तूप मालिश केल्यानं काळी वर्तुळं कमी होतात. तुपामुळे रक्ताभिसरण सुधारत डोळ्यांखालील त्वचेला पोषण मिळतं.
फाटलेल्या ओठांवर उपचार
केवळ चेहराच नाही तर तूप ओठांसाठी उपयोगी ठरतं. झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावल्यानं ते मऊ आणि गुलाबी राहतात. लिप बाम म्हणून तुपाचा वापरू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 5:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा तूप, वाचा गुणकारी तुपाचे आरोग्यदायी फायदे


