Nadi Shodhana : नाडी शोधन प्राणायमामुळे मिळेल मानसिक शांतता, जाणून घ्या पद्धत आणि फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
प्राणायामाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'नाडी शोधन प्राणायाम'. यामुळे शरीरातील ऊर्जा वाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते. नुकतंच, आयुष मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नाडी शोधन प्राणायामाबद्दल तपशीलवार माहिती दिली. शरीर, मन आणि आत्मा शांत करणारी आणि परस्पर संतुलन निर्माण करणारी पद्धत म्हणून आयुष मंत्रालयानं याचं महत्त्व सांगितलं आहे.
मुंबई : ताणामुळे मानसिक थकवा येतो. जीवनशैलीतल्या बदलांमुळे मुलं असोत किंवा प्रौढ, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानसिक दबाव असतो. अशावेळी, योग आणि प्राणायाम हे शरीर आणि मन यांच्यातील संतुलन राखण्याचा एक सोपा मार्ग आहे.
प्राणायामाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाडी शोधन प्राणायाम. यामुळे शरीरातील ऊर्जा वाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते. नुकतंच, आयुष मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नाडी शोधन प्राणायामाबद्दल तपशीलवार माहिती दिली.
शरीर, मन आणि आत्मा शांत करणारी आणि परस्पर संतुलन निर्माण करणारी पद्धत म्हणून मंत्रालयानं याचं वर्णन केलं आहे. हे प्राणायाम करताना, एका नाकपुडीतून श्वास घेतला जातो आणि दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर सोडला जातो. या व्यायामामुळे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागात संतुलन करण्यासाठी मदत होते आणि अधिक लक्ष केंद्रित करणं शक्य होतं तसंच मन शांत होण्यास मदत होते.
advertisement
नाडी शोधन प्राणायाम केल्यानं शरीरातील नसा स्वच्छ होतात, ज्यामुळे शरीर दिवसभर सक्रिय राहते. ही ऊर्जा मुलांना अभ्यास आणि खेळांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते, तर प्रौढांना ऑफिस किंवा घरातील कामांवर चांगलं लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. यामुळे एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढते.
सतत जलद श्वास घेण्याऐवजी शांत आणि खोल श्वास घेतल्यानं आपल्या मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो. यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते. जे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत किंवा जे लवकर गोष्टी विसरतात त्यांच्यासाठी हे प्राणायाम एक नैसर्गिक औषधासारखं आहे.
advertisement
ही पद्धत तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हळूहळू श्वास घेतल्यानं आणि सोडल्यानं मज्जासंस्था शांत होते. मनात होणारी चिंता किंवा अतिविचार थांबतो. यामुळे मन हलकं होतं आणि चिंता दूर होऊ लागते. निद्रानाशाची तक्रार करणाऱ्यांनाही यामुळे खूप आराम मिळतो.
advertisement
- नाडी शोधन प्राणायामामुळे विचार करण्याच्या आणि अनुभवण्याच्या क्षमतेत संतुलन येतं.
- भावनिकदृष्ट्या लवकर अस्वस्थ होणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना निर्णय घेताना गोंधळ होतो त्यांच्यासाठी हे प्राणायाम खूप उपयुक्त ठरू शकतं.
- मेंदूचा डावा भाग तर्क करतो, तर उजवा भाग भावनांशी जोडलेला असतो. दोघांमध्ये संतुलन असतं तेव्हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर होते.
- प्रथमच नाडी शोधन करत असाल तर श्वास घेणं आणि उच्छवासाच्या समान कालावधीनं सुरुवात करावी. चार  सेकंदात श्वास घेणं आणि चार सेकंदात सोडणं. हळूहळू, जेव्हा सरावात आरामदायी वाटेल, तेव्हा वेळ वाढवता येतो.
advertisement
- दररोज दहा-पंधरा मिनिटं असं केल्यानं मन शांत राहतं आणि शरीर निरोगी राहतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 10:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Nadi Shodhana : नाडी शोधन प्राणायमामुळे मिळेल मानसिक शांतता, जाणून घ्या पद्धत आणि फायदे


