Osteoporosis : ऑस्टियोपोरोसिसच्या रुग्णांसाठी महत्त्वाच्या हेल्थ टिप्स, पावसाळ्यात अशी घ्या काळजी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
ऑस्टियोपोरोसिस म्हणजे ज्यात हाडं कमकुवत होतात, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, ऑस्टियोपोरोसिसच्या रुग्णांसाठी पावसाळा खूप धोकादायक ठरू शकतो.
मुंबई : ज्या रुग्णांना पावसाळा, थंडीचा त्रास होतो त्यांना उन्हाळा चांगला वाटतो. कारण तेव्हा त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी कमी असतात. अशा रुग्णांना, पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. विशेषतः ऑस्टियोपोरोसिस असलेल्यांसाठी या काळात तक्रारी वाढतात. ऑस्टियोपोरोसिस म्हणजे ज्यात हाडं कमकुवत होतात, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, ऑस्टियोपोरोसिसच्या रुग्णांसाठी पावसाळा खूप धोकादायक ठरू शकतो.
advertisement
पावसामुळे रस्ते आणि घराची फरशी निसरडी होते, ज्यामुळे पडण्याचा धोका देखील वाढतो. एखाद्या व्यक्तीची हाडं आधीच कमकुवत असतील तर पडल्यानं हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. याशिवाय पावसाळ्यात हवामानात बदल होतो. कधीकधी थंडी अचानक वाढते, तर कधीकधी दमटपणा येतो. या बदलामुळे वातावरणाचा दाब कमी होतो, ज्याचा परिणाम सांध्यांवर होतो.
advertisement
वातावरणात ओलावा असतो तेव्हा हवा थंड होते, ज्यामुळे स्नायू कडक होतात आणि सांधे कडक होतात.
अशा परिस्थितीत, ऑस्टियोपोरोसिसच्या रुग्णांना वेदना होणं आणि सूज येण्याची समस्या वाढू शकते. ऑस्टियोपोरोसिसच्या रुग्णांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सांधे उबदार ठेवणं हा सर्वात महत्वाचा उपाय आहे. वातावरण थंड असतं तेव्हा शरीराला ओलं होण्यापासून वाचवणं महत्त्वाचं आहे.
advertisement
एनआयएच म्हणजेच National Institute of Health च्या मते, गरम पाण्याचा शेक घेतल्यानं सांध्यातील कडकपणा आणि सूज कमी होऊ शकते. विशेषतः सकाळी जेव्हा वेदना जास्त असतात तेव्हा कॉम्प्रेस म्हणजेच गरम पाण्याची पिशवीचा शेक घेणं फायदेशीर ठरू शकतं.
याशिवाय, घराच्या आत, बाथरूममधे आणि घराच्या इतर भागात अँटी-स्लिप मॅट्स बसवावेत. ओल्या जमिनीवर चालण्यासाठी, घसरण्यापासून रोखणारे बूट किंवा चप्पल घाला. गरज पडली तर, पडण्याचा धोका कमी करण्यासाठी वॉकिंग स्टिक किंवा वॉकरचा वापर करा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 9:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Osteoporosis : ऑस्टियोपोरोसिसच्या रुग्णांसाठी महत्त्वाच्या हेल्थ टिप्स, पावसाळ्यात अशी घ्या काळजी