Brahm Muhurta : शरीर - मनासाठी उत्तम मार्ग, ब्राह्म मुहूर्ताचं महत्त्व नक्की वाचा, सवयी बदला, आरोग्य सुधारेल

Last Updated:

ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी सकाळी चार ते सहा या वेळेत उठल्यानं मन शांत राहतं आणि स्मरणशक्ती देखील सुधारते. या वेळी जागं झाल्यानं श्वासोच्छवासाद्वारे ताजी हवा शरीरात प्रवेश करते. त्याचबरोबर मेंदू ताजातवाना होतो, ज्यामुळे ताण कमी होतो आणि संपूर्ण दिवस चांगला जातो.

News18
News18
मुंबई : लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्य संपदा लाभे हे घरातल्या मोठ्यांनी सांगितलेल्या उपदेशाकडे दुर्लक्ष झालं असेल तर त्याचे आरोग्यासाठीचे फायदे सांगणारी ही माहिती आहे. रात्री वेळेवर झोपलात आणि सकाळी वेळेवर उठलात तर संपूर्ण दिवस ताजंतवानं वाटेल.
ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी सकाळी चार ते सहा या वेळेत उठल्यानं मन शांत राहतं आणि स्मरणशक्ती देखील सुधारते. या वेळी जागं झाल्यानं श्वासोच्छवासाद्वारे ताजी हवा शरीरात प्रवेश करते. त्याचबरोबर मेंदू ताजातवाना होतो, ज्यामुळे ताण कमी होतो आणि संपूर्ण दिवस चांगला जातो.
advertisement
आयुर्वेदातला हा सल्ला आपले वडीलधारे देखील देतात. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या आणि मातीच्या भांड्यात पाणी प्यायल्यानं अनेक आजार दूर राहतात. यावेळी कोमट पाणी प्यावं. कोमट पाण्यानं बद्धकोष्ठता, गॅस आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. यामुळे रक्त शुद्धीकरण आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी मदत होते.
एनआयएच नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननं याबद्दल 2012 मध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, तांब्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत होते.
advertisement
पाणी तांब्याच्या भांड्यात काही तास ठेवले तर त्यात असलेले काही हानिकारक जीवाणू मरतात. सुश्रुत संहितेनुसार, कडुनिंब किंवा बाभूळानं दात घासल्यानं मौखिक आरोग्य चांगलं राहतं. तसंच जीभ, दात आणि तोंडात साचलेली घाण स्वच्छ होते आणि हिरड्या देखील मजबूत राहतात. अशा परिस्थितीत सकाळी कडुनिंब, बाभूळ किंवा खैरने दात घासावेत.
सकाळी थंड पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. तसेच, शुद्ध तुपाचे दोन थेंब नाकात टाकावेत. आयुर्वेदानुसार, नाकाला मेंदूचे प्रवेशद्वार मानलं जातं आणि त्यावर तूप लावल्यानं मेंदूचं पोषण होतं, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. पण, ऍलर्जी किंवा नाक बंद असेल तर हा वापर टाळा.
advertisement
सूर्योदयापूर्वी हलका व्यायाम, योगासनं आणि प्राणायाम केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक ताण कमी होतो. सूर्यनमस्कार आणि अनुलोम-विलोम सारखे व्यायाम दररोज करावेत.
आंघोळ केल्यानं वय, शक्ती आणि सौंदर्य वाढतं असं आयुर्वेदात मानलं जातं. कोमट पाण्यानं आंघोळ केल्यानं थकवा आणि आळस दूर होतो, ज्यामुळे मन आनंदी राहतं. यानंतर, ध्यान आणि प्रार्थना करा. यामुळे मन शांत राहण्यास तसंच नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते. यामुळे दिवसभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
advertisement
सकाळी, हलका किंवा ऋतूनुसार आहार घ्यावा, ज्यात मूग डाळ खिचडी, दलिया, फळं किंवा दूध आणि तुपापासून बनवलेल्या गोष्टींचा समावेश असावा. पचन संतुलित करण्याव्यतिरिक्त, लठ्ठपणा रोखण्यास देखील  यामुळे मदत होते आणि दिवसभर शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते.
आयुर्वेदिक दिनचर्येमुळे शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य देखील सुधारणं शक्य आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Brahm Muhurta : शरीर - मनासाठी उत्तम मार्ग, ब्राह्म मुहूर्ताचं महत्त्व नक्की वाचा, सवयी बदला, आरोग्य सुधारेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement