Sugar : साखरेशी मैत्री तोडा, नाहीतर मेंदू होईल कमकुवत, वाचा संशोधनातली महत्त्वाची माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
गोड पदार्थ खाणे जितके मजेदार असतं तितकंच ते जास्त प्रमाणात खाल्ल्यानं मेंदूसाठी देखील हानिकारक ठरू शकते. म्हणून आता आपल्या ताटात साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याची वेळ आली आहे.
मुंबई : गणपतीचे दिवस आहेत म्हणजे गोड पदार्थ खाण्यात येतातच पण एरवीही तुम्हाला गोड खायला मनापासून आवडत असेल आणि भरपूर गोड खात असेल तर आताच सावध व्हा.
चहा, मिठाई, चॉकलेट, केक, कोल्ड्रिंक्स आणि अगदी पॅक केलेल्या ज्यूसमधे भरपूर साखर असते. या गोड पदार्थांमुळे वजन वाढतंच पण मेंदूही कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती नक्की वाचा.
साखरेच्या अतिसेवनानं केवळ शरीराचं नुकसान होतच शिवाय स्मरणशक्ती, मनःस्थिती आणि विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. गोड पदार्थ मेंदूला हळूहळू कसं कमकुवत करू शकतात याविषयी अलिकडेच संशोधन झालं त्यावरुन ही बाब सिद्ध झाली.
advertisement
- मेंदूतील ऊर्जेचं असंतुलन
मेंदूला कार्य करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते, जी साखरेपासून येते. पण, आवश्यकतेपेक्षा जास्त साखर खाल्ली जाते तेव्हा मेंदू ग्लुकोजनं ओव्हरलोड होतो. यामुळे, न्यूरॉन्स म्हणजेच मेंदूच्या पेशी योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होऊ लागते.
advertisement
- स्मरणशक्ती आणि लक्ष कमी होणं
एका अभ्यासानुसार, जास्त साखर खाल्ल्यानं मेंदूच्या हिप्पोकॅम्पस नावाच्या भागावर परिणाम होतो. हा भाग स्मरणशक्ती आणि शिक्षणाशी संबंधित आहे. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.
- मूड स्विंग्स आणि नैराश्य
साखर खाल्ल्यानं शरीरात इन्सुलिनची पातळी झपाट्यानं वाढते, ज्यामुळे रक्तातील साखर प्रथम वाढते आणि नंतर अचानक कमी होते. या चढउतारामुळे मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि नैराश्य देखील येऊ शकतं.
advertisement
- मेंदूवर व्यसनाचा परिणाम
आपण गोड पदार्थ खातो तेव्हा मेंदूच्या रिवॉर्ड सेंटरमधे डोपामाइन सोडलं जातं, ज्यामुळे आपल्याला बरं वाटतं.
पण, हे वारंवार केल्यानं साखरेचं व्यसन लागू शकतं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. त्यामुळे साखरेचं व्यसन लागत असेल तर हा धोका वेळीच ओळखा.
advertisement
- मेंदूचं वय वाढणं आणि डिमेंशिया होण्याचा धोका
जास्त काळ साखर खाल्ल्यानं मेंदूच्या पेशी जलद वयाच्या होतात. यामुळे डिमेंशिया आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हा धोका विशेषतः जास्त असतो.
काय करता येईल ?
साखर कमी खा, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि थंड पेयांमधे हे प्रमाण जास्त असतं.
फळं आणि मध किंवा गूळ यासारखे नैसर्गिक गोड पदार्थ वापरा.
advertisement
नियमित व्यायाम आणि योगानं मेंदूचं आरोग्य सुधारा.
भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या.
गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानं मेंदूसाठी देखील हानिकारक ठरू शकतं. म्हणून आता आपल्या ताटात साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्याची वेळ आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sugar : साखरेशी मैत्री तोडा, नाहीतर मेंदू होईल कमकुवत, वाचा संशोधनातली महत्त्वाची माहिती