TRENDING:

परीक्षा-अभ्यासक्रम नाही, 'ही' शाळा देतेय कॉन्सेप्ट-बेस शिक्षण! पाहा या शिक्षण पद्धतीत काय खास

Last Updated:

या शाळेत सध्या 6 ते 14 वयोगटातील 27 मुलं शिक्षण घेत आहेत. ‘कॉन्सेप्ट-बेस्ड लर्निंग’च्या माध्यमातून कोणत्याही विशिष्ट अभ्यासक्रमाच्या बंधनात न अडकता, मुलांची विचारप्रक्रिया प्रगल्भ करणे, त्यांचा दृष्टीकोन विकसित करणे आणि त्यांच्यात स्वतंत्रपणे जाणून घेण्याची क्षमता वाढवणे हा संस्थेचा हेतू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पारंपरिक शिक्षणपद्धती, गुणांची शर्यत, परीक्षा, ठरलेला अभ्यासक्रम… हीच शाळेची चौकट आपल्याला वर्षानुवर्षे परिचित आहे. मात्र, पुण्यातील कोथरूड भागातील गोकुळ ही शाळा या चौकटीला पूर्णपणे छेद देणारा वेगळा उपक्रम गेली 13 वर्षे सातत्याने राबवत आहे. येथे ना इयत्ता, ना पाठ्यपुस्तके, ना गुणांकन उलट मुलांच्या विचारांची वाढ, सांस्कृतिक मुळांशी नाते, जिज्ञासा आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं— यावर सर्वाधिक भर दिला जातो.ही शाळा नेमकी कशी चालते जाणून घेऊ.
advertisement

या शाळेत सध्या 6 ते 14वयोगटातील 27 मुलं शिक्षण घेत आहेत. ‘कॉन्सेप्ट-बेस्ड लर्निंग’च्या माध्यमातून कोणत्याही विशिष्ट अभ्यासक्रमाच्या बंधनात न अडकता, मुलांची विचारप्रक्रिया प्रगल्भ करणे, त्यांचा दृष्टीकोन विकसित करणे आणि त्यांच्यात स्वतंत्रपणे जाणून घेण्याची क्षमता वाढवणे हा संस्थेचा हेतू आहे. या उपक्रमाच्या मागील प्रेरणा सांगताना संस्थापिका डॉ. ज्योत्सना पेटकर म्हणतात, मुलगी शाळेत जाईल तेव्हा तिला कॉन्सेप्ट बेस शिक्षण कस मिळेल याचा विचार मनात आला. अभ्यासक्रम, पाठांतर, स्पर्धा… या सगळ्यांपलीकडे काहीतरी हवं होतं. म्हणूनच कॉनसेप्च्युअल लर्निंगवर आधारित शिक्षण पद्धतीचा प्रयोग सुरू केला.

advertisement

येथील शिक्षणात सर्व विषय संकल्पनांवर आधारित असतात. गणित, इतिहास, भूगोल, करंट अफेअर्स, सण-समारंभ, खाद्यसंस्कृती अशा विविध गोष्टी मुलं प्रत्यक्ष अनुभवातून, प्रात्यक्षिकांतून शिकतात. उदाहरणार्थ, गणितात फक्त बेरीज-वजाबाकी शिकवण्याऐवजी, ती संकल्पना वास्तव आयुष्यात कशी लागू होते, हे मुलं स्वतः शोधतात. विज्ञानातील धडे प्रयोगांमधून शिकवले जातात. तर इतिहास आणि संस्कृती परिचय तून दिला जातो.

advertisement

कोथरूडसह सिंहगड रोड, कात्रज, आंबेगाव या भागांतून मुलं नियमितपणे येथे येतात. या सर्व पालकांचे एकच मत मुलं इथे पुस्तकांनी नाही, तर अनुभवांनी शिकतात.मुलांना भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, विविध संस्कृती, परंपरा अशा विषयांचा परिचयही संकल्पनाधारित पद्धतीने करून दिला जातो. फक्त काय घडलं हे न शिकवता, का घडलं आणि कसं घडलं यावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे मुलांचं तर्कशक्ती आणि विश्लेषण कौशल्य विकसित होतं.

advertisement

या पद्धतीचा परिचय देताना इंद्रायणी चव्हाण सांगतात, मुलांना आमची सांस्कृतिक ओळख, परंपरा, त्यामागची विज्ञाननिष्ठता समजावी, हा उद्देश आहे. याबरोबर कलाकौशल्य, संगीत, निसर्गाशी नातं या गोष्टीही मुलांना शिकवल्या जातात. 6 ते 14 वयोगटातील मुलं येथे संकल्पनाधारित शिक्षण घेतात. पुढे 10वीची परीक्षा देऊ शकतात.  त्यानंतर ते 11 वी-12 वीचे शिक्षण सहजपणे करू शकतात, असे संस्थेचे अनुभव सांगतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम 
सर्व पहा

जगभर शिक्षणात कन्स्ट्रक्टिव लर्निंग आणि ‘एक्सपिरियन्सियल लर्निंग’बद्दल चर्चा सुरू असताना, गोकुळ शाळेचा हा प्रयोग मुलांच्या स्व-विकासात सकारात्मक बदल घडवतोय. गुण कमी-जास्त होण्याच्या दबावाऐवजी, मुलांच्या विचारविश्वाला उभारी देणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी ही शिक्षण पद्धती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
परीक्षा-अभ्यासक्रम नाही, 'ही' शाळा देतेय कॉन्सेप्ट-बेस शिक्षण! पाहा या शिक्षण पद्धतीत काय खास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल