हिरोशिमा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हे उघड झालं आहे. हा अभ्यास जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासानुसार पोर्फायरोमोनास गिंगिव्हालिस बॅक्टेरिया हिरड्यांच्या आजारासाठी जबाबदार आहे, हेच बॅक्टेरिया अचानक हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकशी संबंधित आजार असलेल्या अॅट्रियल फायब्रिलेशन (एएफआयबी) चा धोका वाढवू शकतात.
पीरियडोन्टायटीसमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होतो हे आधीच माहित होतं. पण एका नवीन अभ्यासात असं आढळून आलं आहे की अशा लोकांमध्ये अॅट्रियल फायब्रिलेशनचा धोका 30 टक्क्यांपर्यंत जास्त असतो. अॅट्रियल फायब्रिलेशन म्हणजेच AFib ही हृदयाशी संबंधित एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल, स्ट्रोक यासारख्या जीवघेण्या समस्या सामान्य आहेत. गेल्या काही दशकांत अशा प्रकरणांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. 2010 मध्ये 3.35 कोटी लोक या आजारांना बळी पडले होते, परंतु 2019 मध्ये अशा रुग्णांची संख्या 6 कोटींवर पोहोचली.
advertisement
Heart Attack : काय खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो? कोणते पदार्थ वाढवतात धोका?
पूर्वी असं मानलं जात होतं की हिरड्यांमध्ये जळजळ झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते, ज्यामुळे हिरड्यांमधील सक्रिय रोगप्रतिकारक पेशी काही रसायने सोडतात, जी रक्तप्रवाहात पोहोचतात आणि शरीराच्या इतर भागांना नुकसान करतात. म्हणजेच, हिरड्यांच्या आजारामुळे काही हानीकारक रसायने रक्तात पोहोचतात, हे माहिती होतं. पण नवीन अभ्यासातून असं दिसून आलं आहे की या आजारात केवळ रसायनेच नाही तर जीवाणू स्वतः शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पोहोचत आहेत. हे जीवाणू हृदयाच्या स्नायू, झडपा आणि धमन्यांच्या आतील थरांना नुकसान करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हिरड्यांमुळे शरीराच्या इतर भागांना तसंच मेंदू, यकृत आणि गर्भाशयातही हिरड्यांना होणारे नुकसान दिसून आलं आहे. पण ते हृदयापर्यंत कसं पोहोचतं हे आतापर्यंत माहित नव्हतं, नवीन अभ्यासात हे स्पष्ट झालं आहे की पी. जिन्जिव्हलिस बॅक्टेरिया थेट हृदयाच्या डाव्या कर्णिकापर्यंत पोहोचू शकतात. यावरून हे सिद्ध होतं की पीरियडोंटायटीस आणि एएफआयबी यांच्यात सूक्ष्मजीव संबंध असू शकतो.
Heart Attack : पोटात दुखलं तरी येऊ शकतो हार्ट अटॅक, कनेक्शन काय?
अभ्यासाचे प्रमुख लेखक शुन्सुके मियाउची म्हणाले की, पीरियडोंटायटीस आणि एएफआयबी यांच्यातील थेट संबंध अद्याप स्पष्ट नसला तरी, रक्ताद्वारे बॅक्टेरियाचा प्रसार या दोन स्थितींना जोडू शकतो. पी. जिन्जिव्हलिस बॅक्टेरिया केवळ हिरड्यांच्या आजारातच नव्हे तर शरीराच्या इतर भागांमध्येही गंभीर परिणाम करण्यास सक्षम आहे.
अचानक हार्ट अटॅक कसा टाळायचा?
हे सिद्ध झालं आहे की दंत रोगांमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, म्हणून दररोज रात्री नियमितपणे ब्रश करा. दिवसातून एकदा फ्लॉसिंग करा. फ्लॉसिंग म्हणजे दातांमधील घाण धाग्याने काढून टाकणं. तसंच, नियमित दंत तपासणी करत रहा. जर हिरड्या निरोगी असतील तर शरीरात पी. गिंगिव्हालिस सारख्या बॅक्टेरियाचा प्रवेश थांबवता येतो. दिवसातून दोनदा ब्रश करणे लक्षात ठेवा, मऊ ब्रिस्टल टूथब्रश आणि फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरा. प्रत्येक वेळी दोन मिनिटे ब्रश करा. दर तीन-चार महिन्यांनी टूथब्रश बदला. जर त्यापूर्वी टूथब्रशची वायर जीर्ण झाली असेल तर ती देखील बदला. माउथवॉश आणि जीभ क्लिनर वापरा. गोड पदार्थ आणि पेये टाळा आणि तंबाखू टाळा. दर सहा महिन्यांनी दंतवैद्यांकडून तपासणी आणि स्वच्छता करा.