Heart Attack : काय खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो? कोणते पदार्थ वाढवतात धोका?

Last Updated:

Food causes Heart attack : असं म्हणतात की, तुम्ही दररोज खाल्लेल्या काही गोष्टी हृदयविकार आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे तुमचा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

News18
News18
नवी दिल्ली : हृदयविकाराची अनेक कारणं आहेत. खराब जीवनशैली, वय आणि कौटुंबिक इतिहास अशी बरेच. पण आणखी एक कारण ते म्हणजे तुमचं खाणंपिणं. असं म्हणतात की, तुम्ही दररोज खाल्लेल्या काही गोष्टी हृदयविकार आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.
चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे तुमचा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. असे कोणते पदार्थ आहेत जे हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात ते पाहुयात.
अति प्रमाणात मीठ, साखर, फॅट्सयुक्त पदार्थ
एका अहवालानुसार, साखर, फॅट्स आणि मीठ जास्त असलेले पदार्थ हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात. जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल, तर या गोष्टींचं कमी प्रमाणात किंवा अजिबात सेवन करू नका. त्याऐवजी फळे-भाज्या, धान्य, प्रथिने आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ खा.
advertisement
रेड मीट
एका अभ्यासानुसार, रेड मीटचं जास्त सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. यात संतृप्त चरबीचं प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणे म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण देणं.
कार्बोहायड्रेटेड ड्रिंक्स
सोडा किंवा कोल्ड्रिंक्ससारखी साखरयुक्त पेये मोठ्या प्रमाणात प्यायल्याने फक्त हार्ट अटॅकच नाही तर सोबत मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी टाळा आणि आहारात साधं पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी यासारख्या पेयांचा समावेश करा.
advertisement
बिस्कीट्स, केक
विविध प्रकारचे स्नॅक्स, बेक केलेले बिस्किटे आणि केक भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. खरं तर या गोष्टी बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. या गोष्टींमध्ये भरपूर
साखर असते, ज्यामुळे वजन वाढू शकतं. यामुळे ट्रायग्लिसराइडची पातळीदेखील वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो.
advertisement
ब्रेड, पास्ता
पांढरा भात, ब्रेड आणि पास्ता साखरेत बदलतात आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो. तांदूळ, ब्रेड, पास्ता
आणि मैद्यापासून बनवलेल्या स्नॅक्समध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे नसतात. या गोष्टी साखरेत बदलतात, जे तुमचे शरीर चरबीच्या रूपात घेते. वरवर पाहता चरबीचा हृदयविकार आणि टाइप 2 मधुमेहाशी संबंध आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : काय खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो? कोणते पदार्थ वाढवतात धोका?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement