कधी तुम्ही विचार केला आहे का की, कर्ज मिळवण्यासाठी सर्व माहिती पुरवून देखील तुमचा अर्ज का नाकारला जातो? आश्चर्याची बाब म्हणजे तुमचं वय हे एक कारण असू शकतं. बँक कधी कधी वयावर आधारित कर्ज मंजुरी घेण्यासाठी निवडक असू शकतात आणि 40 वर्षांवरील कर्जदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
40 वर्षांवरील कर्जदारांना येणाऱ्या अडचणी
advertisement
• उच्च व्याज दर : 40 वर्षांवरील ग्राहकांना बँका एक प्रकारे उच्च जोखमीचे कर्जदार मानतात, कारण त्यांचं उत्पन्न भविष्यकाळात कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे, कर्जदारांसाठी व्याज दर सामान्यत: जास्त असतो.
• कठोर उत्पन्न निकष : वय वाढत असताना, कर्जदारांना बँका उच्च जोखमीचे कर्जदार मानतात, कारण त्यांचा एक मोठा भाग कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आलेला असतो. यामुळे, बँका कठोर उत्पन्नाचे निकष लावतात.
• कर्जाच्या मुदतीचा कालावधी कमी : बँका वयोमानानुसार कर्जाची परतफेड कधी होईल, याचा विचार करतात. सेवानिवृत्तीपासून कमी कालावधीत कर्जाची परतफेड करावी लागते. यामुळे, अधिक मासिक हप्ते भरावे लागतात, जो की, कमकुवत उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.
वयोमानानुसार कर्ज घेणाऱ्यांना जे कर्ज मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. पण याचा अर्थ असा नाही की ते कर्ज मिळवू शकत नाहीत. 3 सोप्या उपायांद्वारे ते या अडचणींवर मात करू शकतात.
• कर्ज पर्यायांची तुलना करा : तुम्ही कर्ज घेण्यासाठी पर्यायांची तुलना करू शकता. अनेक कर्ज देणाऱ्यांकडून मिळणाऱ्या ऑफर्सवर संशोधन करा आणि तुमच्या क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम आणि व्याज दराच्या आधारावर योग्य पर्याय निवडा. पण लक्षात ठेवा, एकाच वेळी अनेक कर्ज अर्ज केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
• उच्च क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा : तुमचा क्रेडिट इतिहास काय आहे? तुम्ही वेळेवर कर्ज फेडले का? तुमचा कर्ज-उत्पन्न प्रमाण काय आहे? बॅंका चांगल्या क्रेडिट इतिहास असलेल्या कर्जदारांना पसंती देतात. चांगला क्रेडिट स्कोअर याचा दाखला देतो की कर्जदार चांगला आर्थिक व्यवहार करतो आणि कर्जाच्या परतफेडीमध्ये कमी जोखमीचा असतो.
• जास्त डाउन पेमेंट करा : अधिक डाउन पेमेंट केल्याने तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी पात्र ठरू शकता. जास्त डाउन पेमेंट केल्याने बँकेचा जोखीम कमी होतो आणि कर्जदार म्हणून तुमची विश्वासार्हता वाढते.
वयोमानानुसार कर्ज घेणाऱ्यांसाठी अनेक अडचणी असू शकतात, पण या अडचणींवर मात करून योग्य मार्गाने कर्ज मिळवण्याची संधी आहे. योग्य प्लॅनिंग आणि उपाययोजना करून तुम्ही घर कर्ज मिळवण्याची तुमची शक्यता वाढवू शकता.
हे ही वाचा : Personality Test : पायाचं पहिलं बोट इतरांपेक्षा लांब असेल तर… तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात माहितीय का?
हे ही वाचा : ‘लाडक्या बहिणी’चा विषय संपला, शपथविधी होताच भावाला हजार कोटींची संपत्ती परत मिळाली : नाना पटोले