पनीर पॉपकॉर्न: नावातून तुमच्या लक्षात आलंच असेल की पनीर पॉपकॉर्न हे मांसाहारी लोकांच्या चिकन पॉपकॉर्नच्या बरोबरीचे आहेत. ही कुरकुरीत, डिलिशियस ट्रीट बनवण्यासाठी तुम्हाला पनीरचे चौकोनी तुकडे करावे लागतील. त्यावर मसाले आणि कॉर्नफ्लेक्स घालून कोट करा आणि नंतर मध्यम गरम तेलात तळून घ्या.
पनीर टिक्की: सहसा, टिक्की मॅश केलेल्या बटाट्यापासून बनलेली असते. बटाट्यापासून टिक्की तयार करून ती बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत तळली जाते. पनीर टिक्की म्हणजे, मिरची आणि मसाल्यांसोबत मॅश केलेले बटाटे आणि पनीर यांचं मिश्रण असतं. कोथिंबीर चटणी किंवा चिंचेच्या चटणीबरोबर ती खाता येते.
advertisement
पनीर पकोडा किंवा फ्रिटर्स: पकोडा म्हणजे भजी हा भारतीय घरातील सर्वकालीन आवडता नाश्ता आहे, विशेषतः पावसाळ्यात तर अतिशय आवडीनं विविध प्रकारच्या भजी खाल्ल्या जातात. पनीर पकोडा ही एक स्वादिष्ट तळलेली डिश आहे, जिचा आस्वाद सामान्यतः चहासोबत घेतात. पनीरचे छोटे किंवा मध्यम आकाराचे तुकडे केले जातात, नंतर घट्ट कालवलेल्या बेसन पिठात बुडवून सोनेरी होईपर्यंत तळले जातात. बेसनाच्या पिठात तिखट आणि मीठ टाकणं गरजेचं आहे.
Morning Routine : रोज सकाळी भिजवलेल्या हरभऱ्यासोबत खा 'हा' पदार्थ, आरोग्याला होतील 5 चमत्कारी फायदे
कॉर्न फ्लेक्स पनीर: जर तुम्ही तळलेल्या माशांचे चाहते असाल तर तुम्हाला कॉर्न फ्लेक्स पनीर नक्कीच आवडेल. ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला पनीरचे तुकडे करावे लागतील आणि नंतर ते अंडी आणि पिठात मॅरिनेट करावं लागेल. त्यानंतर त्यावर बारीक केलेल्या कॉर्नफ्लेक्सचा कोट लावा आणि मध्यम आचेवर तळून घ्या. हा पदार्थ केचप सोबत उत्तम प्रकारे सर्व्ह करता येतो.
पनीर लॉलीपॉप: भाज्या, पनीर, मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट आणि कॉर्नफ्लोअरपासून पनीर लॉलीपॉप बनवलेलं असतं. हे मिश्रण एका काठीवर लॉलीपॉपसारखं लावलं जातं. नंतर ते काळी मिरी, लाल मिरची पेस्ट, कॉर्नफ्लोअर, पाणी आणि मीठ घालून बनवलेल्या पिठात बुडवलं जातं आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळलं जातं.