पुरुषांमध्ये कंबरेचा आकार किती असावा?
ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, जर एखाद्या निरोगी माणसाच्या कंबरेचा आकार 90 सेंटीमीटर म्हणजेच 35.4 इंचापेक्षा कमी असेल तर तो निरोगी मानला जाईल. मात्र, युरोपियन लोकांमध्ये कंबरेची आयडियल साईज 94 सेमी किंवा 37 इंच मानली जाते आणि जर ती साईज 94 ते 102 सेमी किंवा 37 ते 40 सेमी दरम्यान असेल तर तो उच्च धोका मानला जातो. तर दक्षिण आशियाई, चायनीज, जपानी आणि आफ्रिकन कॅपिबायन लोकांच्या कंबरेचा आकार 35.4 इंचांपेक्षा जास्त असेल तर तो उच्च धोका मानला जातो.
advertisement
भारतीय वातावरणानुसार कंबरेचा परफेक्ट आकार कोणता असावा याबाबत कोणतीही परिपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. सर गंगाराम हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. श्रीहरी अनिखिंडी यांच्यामते, भारतातील लठ्ठपणा वेगळ्या प्रकारचा आहे. इथे पोटाजवळ जास्त चरबी जमा होते. म्हणून भारतात कंबरेचे मोजमाप करण्याचा योग्य मार्ग म्हणजे कंबरेपासून थोडे वर, नाभीजवळ मोजणे. मात्र, नाभीजवळ मोजमाप घेतल्यास ते काय असावे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. म्हणून असे मानले जाते की, नाभीजवळील पुरुषांच्या कंबरेचा आकार 35 इंचांपेक्षा जास्त नसावा.
इतकी असावी कंबरेची आयडियल साईज
पुरुष
मध्यम - 35.4
उच्च धोका - 40 इंच
महिला
मध्यम - 31.5
उच्च धोका - 36 इंच
महिलांच्या कंबरेची आयडियल साईज
ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, युरोपियन, काळ्या आफ्रिकन आणि मध्य पूर्व महिलांसाठी आदर्श कंबर आकार 80 सेंटीमीटर किंवा 31.5 इंच असावा. जर महिलांच्या कंबरेचा आकार 31.5 इंच ते 34.6 इंच दरम्यान असेल तर तो उच्च धोका मानला जातो. तर दक्षिण आशियाई, चिनी आणि जपानी महिलांमध्ये परिपूर्ण कंबरेचा आकार 80 सेमी किंवा 31.5 इंचापेक्षा कमी असावा. जर महिलांच्या कंबरेचा आकार यापेक्षा जास्त असेल तर त्यांना जास्त धोका असतो.
उंचीनुसार कंबरेचा आकार किती असावा?
आदर्शपणे, कंबरेची साईज उंचीच्या अर्धी असायला हवी (इंच मध्ये). म्हणजेच, जर तुमची उंची 5 फूट 6 इंच असेल तर याचा अर्थ तुमची इंच उंची एकूण 66 इंच आहे. यानुसार तुमच्या कंबरेचा आकार 33 इंच असावा. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, जर पुरुषांमध्ये कंबरेचा घेर 40 इंच आणि महिलांमध्ये 35 इंचांपेक्षा जास्त असेल तर ओटीपोटाच्या लठ्ठपणासाठी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे हा कंबरेचा घेर म्हणजे नाभीजवळील मोजमाप असावे.