कृत्रिम रंग आणि रसायनांचे परिणाम शरीरावर जाणवतात. काहींना अंगावर खाज येते आणि सूज येते. होळीसाठी वापरले जाणारे कृत्रिम रंग त्वचेसाठी हानिकारक असतात. या रंगांमधे कठोर रसायनं, जड धातू आणि औद्योगिक रंग असतात. हे रंग आपल्या त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा त्वचेच्या नैसर्गिक आणि संरक्षणात्मक तेलं पूर्णपणे काढून टाकली जातात. यामुळे त्वचा अत्यंत कोरडी, संवेदनशील होते, ज्यामुळे रंग धुतल्यानंतरही खाज सुटणं, लालसरपणा किंवा सौम्य पुरळ उठतं.
advertisement
Hydration : पाणी प्या, शरीराला लागेल तितकं पाणी पिताय का ? दुर्लक्ष करु नका
रंग घालवण्यासाठी त्वचा घासू नका - अनेकदा त्वचेवरील हट्टी रंग काढून टाकण्यासाठी त्वचा जोरात घासतात आणि वारंवार धुण्याचा प्रयत्न करतात. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो, ज्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ वाढते.
त्वचेला आराम देण्यासाठी काय करता येईल -
सौम्य स्वच्छता: आंघोळ करताना, त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा. साबण-मुक्त, सौम्य क्लींजर वापरा. स्पंज वापरणं टाळा आणि त्वचा घासणं किंवा एक्सफोलिएट करणं टाळा.
मॉइश्चरायझर : कोरडेपणा कमी करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच त्वचेवर मॉइश्चरायझरचा जाड थर लावा.
Fatty Liver : चुकीच्या सवयींमुळे येतो यकृतावर ताण, वाढतो गंभीर आजारांचा धोका
कोरफड, ग्लिसरीन, सेरामाइड्स आणि कोलाइडल ओटमील-आधारित लोशन किंवा क्रीम त्वचेला आराम देण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा ?
रंगांमुळे आलेली खाज तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिली, शरीराच्या इतर भागात पसरली किंवा त्वचा सुजली आणि पाणीदार झाली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. कारण हे कॉन्टॅक्ट डर्माटायटीसचे किंवा गंभीर ऍलर्जीक रिएक्शनचं लक्षण असू शकतं, ज्यासाठी योग्य वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.
