TRENDING:

Soya Thecha : फक्त 20 मिनिटांत बनवा हाय प्रोटीन सोया ठेचा! वरण-भातासाठी परफेक्ट साईड डिश, पाहा रेसिपी

Last Updated:

Protein Rich Soya Thecha Recipe : तुम्ही भाजी चपाती खात असाल किंवा वरण-भात, ही साईड डिश तुमच्या जेवणाला रंगत आणेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत झणझणीत सोयाबीन चंक्सचा ठेचा कसा बनवायचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : आपल्या आहारात सर्व पदार्थ आणि पोषक तत्वांचे प्रमाण योग्य असले पाहिजे. तेव्हा ते संपूर्ण अन्न बनते आणि त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. परंतु भारतीय आहारात सर्वात जास्त प्रमाण कार्बोहायड्रेट्सचे असते. मात्र आपल्या शरीराला तितकीच प्रोटीनचीही आवश्यकता असते. म्हणूनच आआज आम्ही तुमच्यासाठी एक प्रोटीन रिच झणझणीत साईड डिश घेऊन आलो आहोत.
प्रोटीन रिच सोया ठेचा रेसिपी
प्रोटीन रिच सोया ठेचा रेसिपी
advertisement

तुम्ही भाजी चपाती खात असाल किंवा वरण-भात, ही साईड डिश तुमच्या जेवणाला रंगत आणेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत झणझणीत सोयाबीन चंक्सचा ठेचा कसा बनवायचा. ही रेसिपी feastlyfit या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. ही अत्यंत सोपी आणि तितकीच टेस्टी रेसिपी आहे.

प्रोटीन रिच सोया ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य..

- सोया चंक्स

advertisement

- हिरवी मिरची

- तीळ

- शेंगदाणे

- कोथिंबीर

- लसूण

- मीठ

- पाणी

- तेल

- कांदा

प्रोटीन रिच सोया ठेचा बनवण्याची कृती

- सर्वात आधी सोयाबीनचे चंक्स मीठ, आले-लसूण पेस्ट आणि चिमूटभर साखर घालून उकळवा.

- उकळल्यानंतर सोया चंक्स गाळून बाजूला ठेवा.

- त्यानंतर एका पॅनमध्ये शेंगदाणे आणि पांढरे तीळ कोरडे भाजून घ्या.

advertisement

- त्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या घाला आणि हलके परतून घ्या.

- नंतर ताजी कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.

- हे मिश्रण थंड झाल्यावर ते जाडसर वाटून घ्या.

- आता सोया चंक्सला धणे पावडर आणि लाल तिखट लावून घ्या.

- आता एका पॅनमध्ये कमीत कमी तेल टाकून गरम करा, त्यात कांदे परतून घ्या.

advertisement

- नंतर त्यामध्ये सोया घाला, थोडेसे पाणी आणि बनवलेलं वाटण घालून शिजवूं घ्या.

- शेवटी लिंबाचा रस आणि ताजे चिरलेले कांदे घाला.

अशाप्रकारे तुमचा सोया ठेचा तयार होतो. हा ठेचा खायला अगदी स्वादिष्ट लागतो. तुम्हाला सोयाबीन चंक्स मोठे आवडत नसतील तर तुम्ही उकळल्यानंतर ते मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊन शकता आणि नंतर ते यामध्ये टाका.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी, पण चालवतात ‘5 स्टार रिक्षा’, Video पाहाल तर आवाक् व्हाल
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Soya Thecha : फक्त 20 मिनिटांत बनवा हाय प्रोटीन सोया ठेचा! वरण-भातासाठी परफेक्ट साईड डिश, पाहा रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल