TRENDING:

Pumpkin Seeds Benefits: तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणतील ‘या’ बिया; पुरूषांसाठी आहेत फायदेशीर, फेकून देण्याची चूक करू नका

Last Updated:

Pumpkin Seeds Benefits: भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. पुरूषांनी या बिया खाल्ल्यातर त्यांच्या शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळू शकते. भोपळ्याच्या बियांमुळे पुरुषांचं लैंगिक आरोग्यदेखील सुधारतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भोपळ्याची भाज्या बनवताना अनेक महिला त्याच्या बिया फेकून देतात, परंतु तुम्ही ही चूक करू नका. कारण या बिया खाल्ल्याने तुमचं वैवाहिक आयुष्य सुधारायला चांगलीच मदत होणार आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यांचे दररोज सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पुरूषांनी या बिया खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळू शकते. भोपळ्याच्या बियांमुळे पुरुषांचं लैंगिक आरोग्यदेखील सुधारतं.
प्रतिकात्मक फोटो : वैवाहिक जीवनात आनंद आणतील ‘या’ बिया, फेकून देण्याची चूक करू नका
प्रतिकात्मक फोटो : वैवाहिक जीवनात आनंद आणतील ‘या’ बिया, फेकून देण्याची चूक करू नका
advertisement

जाणून घेऊयात भोपळ्यांच्या बियांचे फायदे

हार्ट ॲटॅक (Heart Attack)

भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. या बिया रक्तातल्या खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.

advertisement

हे सुद्धा वाचा : FOOD FOR DIEBETIES: डायबिटीस आहे काळजी नको; बिनधास्त खा ‘हे’ पदार्थ, शुगर राहील नियंत्रणात

रोगप्रतिकारक शक्ती (Immunity)

हिवाळ्यात बदलेल्या हवामानामुळे अनेक जण आजारी पडतात. मात्र हिवाळ्यात तुम्हाला तंदुरूस्त राहायचं असेल तर भोपळ्याच्या बिया अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असतं. जे शरीरातील अनेक जैविक प्रक्रियांना आधार देते आणि पेशींच्या दुरुस्तीसाठी मदत करते. भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भोपळ्याच्या बिया फायबरने समृद्ध असतात, ज्यामुळे पचन सुधारते. फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्या दूर होऊ शकतात.

advertisement

चांगली झोप (Sound Sleep)

भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफीन नावाचे अमीनो ॲसिड असतं, जे मेलाटोनिन संप्रेरकाचे उत्पादन वाढवते. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने चांगली झोप येते. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड देखील असतात, जे चयापचय वाढविण्यात मदत करतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एकंदरीत, भोपळ्याच्या बिया या शरीरासाठी सुपरफूड आहेत.

advertisement

लैंगिक आरोग्य सुधारणार (Sex Life)

भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) लैंगिक आरोग्यासाठी फायद्याच्या आहेत. बियांमध्ये असलेले महत्त्वाचे पोषक घटक असतात हार्मोनल संतुलन राखण्यात, उर्जेत वाढ करण्यात, आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक  मोठ्या प्रमाणावर असते. झिंक टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे पुरुषांची लैंगिक क्षमता वाढते.स्त्रियांमध्ये झिंक फर्टिलिटी आणि अंडोत्सर्जन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असतात, जे रक्तप्रवाह सुधारतात आणि ज्यामुळे लैंगिक इच्छा वाढते.भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे डोपामाइन (Dopamine) हार्मोनला उत्तेजित करते. डोपामाइन मूड सुधारण्यात आणि लैंगिक सुख वाढवण्यात मदत करते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pumpkin Seeds Benefits: तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणतील ‘या’ बिया; पुरूषांसाठी आहेत फायदेशीर, फेकून देण्याची चूक करू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल