Benefits of walk after dinner: काय सांगता शतपावलीचे इतके फायदे? ऐकून पडाल चाट, आजपासूनच सुरू करा रात्रीची शतपावली, मात्र त्या आधी घ्या ‘ही’ काळजी

Last Updated:

Benefits of night walk: रात्री चालल्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. शिवाय रक्तातल्या इन्सुलिनमध्ये वाढ होते, ज्यामुळे रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमी होऊन डायबिटीस नियंत्रणात येतो. त्यामुळे शतपावली ही मधुमेहाच्या रूग्णांसाठी प्रचंड फायद्याची आहे.

प्रतिकात्मक फोटो : शतपावलीचे आहेत ‘इतके’ फायदे; सुरू करण्याआधी घ्या ‘ही’ काळजी
प्रतिकात्मक फोटो : शतपावलीचे आहेत ‘इतके’ फायदे; सुरू करण्याआधी घ्या ‘ही’ काळजी
मुंबई :  आपल्या आजी आजोबांपासून किंवा त्यांच्याही आधीपासून रात्रीचं जेवण झाल्यानंतर शतपावली घालण्याची परंपरा होती. गावातल्या व्यक्ती आजही रात्रीचं जेवण झाल्यानंतर अंगणामध्ये शतपावली घालतात. मात्र महानगरं आणि महानगरांमधल्या धकाधकीच्या जीवनात शतपावली हा शब्द आता औषधालाच उरलेला आहे.जीम, कार्डियोच्या जगात शतपावली हा शब्दच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला शतपावलीचे इतके फायदे सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि ही माहिती देत आहेत हैद्राबादचे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. के. सोमनाथ गुप्ता.

डायबिटीसवर नियत्रंण
डॉ. के. सोमनाथ गुप्ता  हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये डायबेटोलॉजीस्ट आहेत. त्यांनी या शतपावलीचे फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. याशिवाय रात्रीच्या जेवणानंतर चालल्यामुळे इन्सुलिनची वाढ होते, ज्यामुळे रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमी होऊन डायबिटीस नियंत्रणात येतो. त्यामुळे शतपावली ही मधुमेहाच्या रूग्णांसाठी प्रचंड फायद्याची आहे.
advertisement

चांगली झोप येते

शतपावलीमुळे अन्न पचल्याला मदत झाल्यामुळे आतड्याचं कार्यही सुरळीत पार पडतं. त्यामुळे रात्री शरीरावर तणाव कमी पडून चांगली झोप लागते. चालल्यामुळे अधिकच्या कॅलरीस बर्न होतात, त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
advertisement

सुसंवाद वाढतो

तुम्ही नियमितपणे शतपावली घालत असाल, तर तुम्हाला पाहून तुमच्या परिवारातले सदस्य किंवा तुमचे मित्र तुमच्यासोबत शतपावली घालायला येतील. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला फायदा मिळेल आणि तुमच्याचला सुसंवादही वाढेल. याशिवाय शतपावलीमुळे आरोग्यात लक्षणीय बदल दिसू शकतात.
advertisement

‘ही’ घ्या काळजी
चालण्याचे अनेक फायदे असले तरीही मॉर्निंग वॉक किंवा शतपावली सुरू करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अस्वस्थता किंवा अपचन टाळण्यासाठी भरपेट खाल्ल्यानंतर 15-30 मिनिटे वाट पाहा मगच चालयला सुरूवात करा. चालण्याची गती ही मध्यम ठेवा जोरात चालल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं किंवा तुमच्या पायात गोळे येऊ शकतात. याशिवाय जर तुम्हाला कोणते आजार असतील तर आधी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच शतपावली किंवा मॉर्निंग वॉकला सुरूवात करण्याचा सल्ला डॉ. गुप्ता देतात. जर रात्रीच्या जेवणानंतर चालणे योग्य वाटत नसेल, तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही चालू शकता. तेही जमत नसेल स्ट्रेचिंग किंवा योगासारख्या हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of walk after dinner: काय सांगता शतपावलीचे इतके फायदे? ऐकून पडाल चाट, आजपासूनच सुरू करा रात्रीची शतपावली, मात्र त्या आधी घ्या ‘ही’ काळजी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement