TRENDING:

Handloom Saree: लाखाच्या अन् हजाराच्या साडीत नेमका फरक काय? Video पाहा, तुम्हालाच कळेल खरं कारण

Last Updated:

Handloom Saree: एक हँडमेड साडी तयार होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो, तर काही विशेष आणि जड नक्षीकाम असलेल्या साड्यांवर वर्षभरही काम केलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: साडी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा आणि परंपरेशी जोडलेला विषय आहे. बाजारात 1000 रुपयांपासून ते लाखोंपर्यंत विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध असतात. मात्र, या किमतीतील मोठा फरक नेमका कशामुळे पडतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. कापडाचा दर्जा, धाग्यांची गुणवत्ता, जरीकाम आणि तयार करण्याची पद्धत यामागील नेमकं गणित काय आहे? तसेच साडी तयार होण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? याबाबत कस्तुरी पैठणीचे नितीन खानापुरे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली.
advertisement

नितीन खानापुरे यांनी सांगितलं की, साडी बनवण्याची प्रक्रिया अत्यंत नाजूक आणि किचकट असते. विशेषतः हँडमेड साडी तयार करताना एकेक तारा गुंफत, अत्यंत बारकाईने आणि लक्षपूर्वक विणकाम करावं लागतं. साडीचं डिझाईन आधी कागदावर तयार केलं जातं आणि त्यानुसार कारागीर प्रत्येक नक्षी जुळवत साडी विणतो. विणकामापूर्वी धाग्यांची निवड, रंगकाम आणि ताना-बाना सेट करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर पल्लू, काठ आणि जरीकाम वेगवेगळ्या टप्प्यांत पूर्ण केलं जातं.

advertisement

MPSC चा अभ्यास सोडला, विलासने पुण्यात उभारला पांढऱ्या पोह्यांचा व्यवसाय, महिन्याला 7 लाखांची उलाढाल

एक हँडमेड साडी तयार होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो, तर काही विशेष आणि जड नक्षीकाम असलेल्या साड्यांवर वर्षभरही काम केलं जातं. त्यामुळे अशा साड्यांची किंमत जास्त असते, कारण त्यामागे कारागरांची मेहनत, कौशल्य आणि वेळ गुंतलेला असतो.

advertisement

हजार आणि लाखाच्या साडीत नेमका फरक काय?

हजार रुपयांच्या साडी आणि लाखोंच्या साडीमध्ये असलेला फरक हा केवळ किमतीपुरता मर्यादित नसून गुणवत्ता आणि कारागिरीतही मोठा असतो. कमी किमतीच्या साड्या बहुतांश मशीनवर तयार केल्या जातात आणि त्यात सिंथेटिक किंवा आर्ट सिल्क धाग्यांचा वापर केला जातो, त्यामुळे त्या कमी वेळात तयार होतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लाखाच्या अन् हजाराच्या साडीत नेमका फरक काय? Video पाहा, तुम्हालाही कळेल खरं कारण
सर्व पहा

लाखोंच्या साड्या शुद्ध रेशीम आणि जरीकामासह हातमागावर विणल्या जातात. प्रत्येक नक्षी हाताने गुंफावी लागते आणि एक साडी तयार होण्यासाठी अनेक महिने लागतात. त्यामुळे अशा साड्यांमध्ये कारागरांची मेहनत, वेळ आणि कौशल्य मोठ्या प्रमाणात गुंतलेले असते, आणि त्यानुसारच त्यांची किंमत ठरते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Handloom Saree: लाखाच्या अन् हजाराच्या साडीत नेमका फरक काय? Video पाहा, तुम्हालाच कळेल खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल