तुमची बहिण कितीही लहान किंवा मोठी असेल तरी तिला मेकअपचं साहित्य नक्कीच आवडत असेल. शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या मधुबन गल्लीत लिपस्टिक, मेकअप बॉक्स, काजळ, नेलपेंट, आयलायनर असे अनेक पर्याय आहेत. यापैकी एक किंवा काही वस्तू तुम्ही रक्षाबंधनाला भेट देऊ शकता.
रक्षाबंधनासाठी पुण्यातील सर्वात स्वस्त बाजार; पैठणीच्या कधीही न पाहिलेल्या वस्तू पाहून बहीण खूश
advertisement
सध्या बहुतेक बहिणींना जीन्स - टॉप्स किंवा लेगिंस - कुर्ती घालणं आवडतं. रोजच्या वापरासाठी लागणारे कुर्ती किंवा टॉप्स या गल्लीत 250 रुपयांपासून उपलब्ध आहेत. काही दुकानात तर रक्षाबंधनाच्या निमित्तानं खास सेल लावण्यात आलाय. चिकनचे कुर्ती, कॉटन कुर्ती आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध असलेले टॉप्स बहिणाला गिफ्ट देण्यासाठी स्वस्त आणि मस्त पर्याय ठरू शकतो.
झुमके हे कोणत्याही बहिणीचा आवडीचा दागिना आहे. लहान किंवा मोठे झुमके, डायमंडचे झुमके, गोल झुमके, मोत्यांचे झुमके, कॉर्पोरेट लुक देणारे छोटे कानातले हे इथं खरेदी करू शकता. अगदी 30 रुपयांपासून याची सुरुवात होते. हा एक गिफ्टसाठी सहज आणि सोपा पर्याय आहे.
श्रावणात पूजेच्या साहित्याची करायचीय खरेदी? 'इथं' मिळतील सर्व वस्तू
वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या , नेकलेस हा देखील गिफ्टचा चांगला पर्याय आहे. सध्या मोत्यांच्या माळा ट्रेडिंगमध्ये आहेत. कुंदनाने सजवलेले नेकलेस घेण्याकडे देखील महिलांचा कल असतो. त्यामुळे तुमच्या बहिणीला असे दागिने घालण्याची आवड असेल आणि तुमचे बजेट जास्त असेल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
पर्स खरेदी सर्वात बेस्ट ऑप्शन
पर्स हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. अगदी 50 रुपयांपासून वेगवेगळ्या आकाराच्या पर्स इथं मिळतात. रक्षाबंधनानिमित्तानं अगदी फ्रेश कलर्सच्या पर्स बाजारात आल्या आहेत. त्यामुळे भावांनो, तुम्हाला अन्य काही खरेदी करण्याबाबत समजत नसेल तर तुम्ही पर्स नक्कीच खरेदी करु शकता.





