तुम्हाला हे आणखी हेल्दी बनवायचे असतील तर तुम्ही ते डीप फ्राय करण्याऐवजी एअर फ्राय करू शकता. यामुळे सामोसे क्रिस्पीही होतील आणि तुम्हाला जास्त तेल खाल्ल्याचा गिल्टही येणार नाही. शिवाय हे समोसे बनवणंही खूप सोपं आहे. कच्च्या केळ्यांमध्ये फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
advertisement
कच्च्या केळीच्या सामोश्यासाठी साहित्य..
या समोस्यांसाठी केळी हलक्या मसाल्यांसोबत शिजवून समोशांमध्ये भरली जातात. यामुळे सामोशांना अप्रतिम चव येते. तसेच ते तितकेच क्रिस्पी बनतात. कच्च्या केळीचे सामोआसे बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. यासाठी तुम्हाला 3-4 कच्ची केळी, 1 कप मैदा, 2 मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ लागेल. त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, थोडा गरम मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर लागेल.
सामोसे बनवण्याची कृती
- सर्वात आधी सामोशाचा सारण बनवायचंय, यासाठी कच्ची केळी धुवून प्रेशर कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या होईपर्यंत उकळा. केळी थंड झाल्यावर साल काढून ती मॅश करा.
- आता एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आले घालून हलके परतून घ्या. त्यात मॅश केलेली केळी मीठ, लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला घालून काही मिनिटे परतून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा. हे समोशाचे सारण तयार होईल.
- दुसरीकडे एका ताटात पीठ घेऊन त्यात थोडे मीठ आणि तेल घालून चांगले मिसळा. नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पीठ झाकून 10-15 मिनिटे मऊ होण्यासाठी बाजूला ठेवा.
- आता या पिठाचे छोटे गोळे बनवून प्रत्येक गोळ्याची पातळ पुरी लाटा. पुरी अर्धी कापून शंकूचा आकार द्या. पुरीमध्ये तयार केलेले केळ्याचे सारण भरा आणि समोशाचा आकार देण्यासाठी कडा घट्ट दाबा. हे सामोसे आता तळण्यासाठी तयार आहेत.
- यानंतर समोसे तळण्यासाठी एका कढईत पुरेसे तेल गरम करा आणि यामध्ये सामोसे टाकून मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. समोसे मंद आचेवर तळा, जेणेकरून ते आतून पूर्णपणे शिजतील आणि बाहेरून क्रिस्पी होतील.
- समोसे सोनेरी तपकिरी झाल्यावर ते काढून जास्तीचे तेल निथळण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा. तयार केलेले कच्च्या केळ्याचे समोसे हिरव्या चटणीसोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा. तुम्हाला सामोसे डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही ते एअर फ्रायदेखील करू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
