TRENDING:

Weight Gain : तिशीनंतर पोटावरची चरबी वेगानं का वाढते ? स्नायूंवर याचा काय परिणाम होतो ?

Last Updated:

पोटाची चरबी वाढणं ही अचानक होणारी प्रक्रिया नाही, तर आपल्या शरीरात घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग आहे. कारण वाढत्या वयानुसार, शरीरातील चयापचय मंदावतं आणि शरीराच्या रचनेत बदल होऊ लागतात आणि खाण्याच्या सवयी देखील बदलतात, ज्यामुळे पोटाची चरबी वाढायला सुरुवातत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वजन वाढणं, लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित आजार ही एक जागतिक समस्या बनली आहे. वयाच्या तिशीनंतर पोटावरील चरबी झपाट्यानं वाढू लागते. विसाव्या वर्षी जो आहार करताना जास्त विचार करायची गरज नसते तेच पदार्थ तिशीत वजन वाढण्यास कारण ठरतात असं अनेकांच्या निरीक्षणात आढळून आलं आहे.
News18
News18
advertisement

पोटाची चरबी वाढणं ही अचानक होणारी प्रक्रिया नाही, तर आपल्या शरीरात घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग आहे. कारण वाढत्या वयानुसार, शरीरातील चयापचय मंदावतं आणि शरीराच्या रचनेत बदल होऊ लागतात आणि खाण्याच्या सवयी देखील बदलतात, ज्यामुळे पोटाची चरबी वाढायला सुरुवातत होते.

Skin Care : स्किनकेअर क्षेत्रातले बदलते ट्रेंड, वाचा 2025 मधे होती कशाची चर्चा

advertisement

आधीसारखे व्यायाम केले तरी वजन कमी होत नाही कारण शरीराची अंतर्गत व्यवस्था वयानुसार वेगळ्या पद्धतीनं काम करते. तिशीनंतर स्नायू कमकुवत होणं, हार्मोनल बदल आणि इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होणं ही पोटाची चरबी वाढण्याची मुख्य कारणं आहेत.

यासाठी फक्त योग्य आहार घेणं पुरेसं नाही, तर काही गोष्टींची वेळीच काळजी घेतली तर म्हातारपणात ही चरबी रोखता येते आणि शरीर सडपातळ ठेवता येतं.

advertisement

वयाच्या तिशीनंतर दर दहा वर्षांनी स्नायूंचं प्रमाण तीन ते आठ टक्क्यांनी कमी होतं. स्नायू विश्रांती घेत असतानाही कॅलरीज बर्न करतात. स्नायूंचं प्रमाण कमी झाल्यामुळे शरीराचा ऊर्जेचा वापर कमी होतो. स्नायू रक्तातील सत्तर ते ऐंशी टक्के ग्लुकोज वापरतात. पण, स्नायूंचं प्रमाण कमी होत असताना, ही साखर रक्तातच राहते आणि पोटात चरबी म्हणून साठवली जाते.

advertisement

Health Tips : संतुलित दिनचर्या - आरोग्यासाठी उत्तम, तंदुरुस्तीसाठी फिटनेस टिप्स

इन्सुलिन प्रतिसाद कमी होणं - वय वाढत असताना, शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता चार ते पाच टक्क्यांनी कमी होते. याचा अर्थ कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकं रक्तातील साखरेची पातळी पूर्वीइतकी लवकर वाढवत नाहीत.

इन्सुलिनची क्रिया मंदावते तेव्हा शरीर अन्नाचं ऊर्जेऐवजी चरबीमत रूपांतर करण्यास सुरुवात करतं, ज्याचा पोट आणि कंबरेच्या भागावर सर्वात जास्त परिणाम होतो.

advertisement

हार्मोनल बदल आणि ताण -  तिशीनंतर, ह्युमन ग्रोथ हार्मोन, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारख्या महत्त्वाच्या संप्रेरकांची पातळी कमी होऊ लागते. व्यस्त जीवनशैलीमुळे तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

या हार्मोनल असंतुलनामुळे, शरीरात पोटात चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे चरबी वाढते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Gain : तिशीनंतर पोटावरची चरबी वेगानं का वाढते ? स्नायूंवर याचा काय परिणाम होतो ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल