Skin Care : 2025 मधे बदलला स्किनकेअर ट्रेंड, फ्लाईट स्किनकेअर ते माचा फेशिअल, वाचा रंजक माहिती

Last Updated:

फ्लाइटमधे म्हणजेच विमानातल्या प्रवासादरम्यान स्किनकेअर करण्यापासून ते त्वचेसाठी माचाचा वापर असे अनेक बदल 2025 मधे पाहायला मिळाले. पाहूयात यातले या वर्षातले बदलते ट्रेंड्स.

News18
News18
मुंबई : 2025 या सरत्या वर्षात बरेच स्किनकेअर ट्रेंडस पाहायला मिळाले. स्किनकेअरच्या जगात सोशल मीडियावर सतत नवीन ट्रेंड येत असतात. या वर्षीही काही एकदम वेगळे आणि नवीन ट्रेंड्स पाहता आले.
फ्लाइटमधे म्हणजेच विमानातल्या प्रवासादरम्यान स्किनकेअर करण्यापासून ते त्वचेसाठी माचाचा वापर असे अनेक बदल 2025 मधे पाहायला मिळाले. पाहूयात यातले या वर्षातले बदलते ट्रेंड्स.
रेड लाईट थेरपी - रेड लाईट थेरपी हा स्किनकेअरमधे एक नवीन ट्रेंड दिसून आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस आणि कृती सनॉन यांनी रेड लाईट थेरपी वापरली. त्वचेच्या पेशींना उत्तेजित करण्यासाठी इन्फ्रारेड लाइटचा वापर यासाठी केला जातो, यामुळे कोलेजन उत्पादन वाढतं आणि त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो.
advertisement
फ्लाइट स्किनकेअर - लांब पल्ल्याच्या विमान प्रवासादरम्यान त्वचेची काळजी घेणं हा एक नवीन ट्रेंड बनला आहे. त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ नये म्हणून विमान प्रवासातही त्वचेची काळजी घेण्याचा ट्रेंड यावर्षी पाहायला मिळाला. यामधे फेस मिस्ट, शीट मास्क, रिच मॉइस्चराइजर, लिप बाम सारख्या गोष्टींचा समावेश असतो.
advertisement
स्किन झोनिंग - स्किन झोनिंग. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळी उत्पादनं वापरणं असा हा ट्रेंड आहे. ही एक टार्गेटेड स्किनकेयर स्ट्रॅटेजी आहे. त्वचेच्या विविध समस्यांसाठी स्किन झोनिंगचा वापरण्याचा ट्रेंड या वर्षी पाहायला मिळाला.
वेअरेबल स्किनकेअर - जनरेशन झेडमधे वेअरेबल स्किनकेयर ट्रेंड व्हायरल झाला आहे. वेअरेबल स्किनकेअर म्हणजेच पर्स किंवा फोन सारखी वापरता येणारी उत्पादनं. या ट्रेंडमधे, मेकअप पाउच आणि मेकअप किट तुमच्या बॅगेला लटकवता येऊ शकतो. तसंच मनगटालाही बांधता येतील अशी ही उत्पादनं आहेत.
advertisement
माचा - माचा हा एक घटक स्किनकेअर उत्पादनांमधे वाढत्या प्रमाणात वापरला जात आहे. यात अँटिऑक्सिडंट्स आहेत. त्वचा शांत करणं आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी याचा वापर केला जातो. 2025 या सरत्या वर्षात ही स्किनकेअर उत्पादनं खूप गाजली.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : 2025 मधे बदलला स्किनकेअर ट्रेंड, फ्लाईट स्किनकेअर ते माचा फेशिअल, वाचा रंजक माहिती
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement