महिलांनो सावधान! फॅशनसाठी हातात घालत असाल मंगळसूत्र तर होईल नुकसान, वैवाहिक जीवनावर होतो परिणाम
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आधुनिक काळानुसार दागिन्यांच्या फॅशनमध्येही मोठे बदल होत आहेत. पूर्वी गळ्यात घातले जाणारे 'मंगळसूत्र' आता अनेक महिला 'ब्रेसलेट' म्हणून हातात घालताना दिसतात. मात्र, पारंपारिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून हे कितपत योग्य आहे?
advertisement
advertisement
धार्मिक आणि पारंपारिक महत्त्व: हिंदू संस्कृतीनुसार, मंगळसूत्र हे गळ्यात परिधान करण्याचे 'सौभाग्य लेणं' आहे. लग्नाच्या वेळी पती ते पत्नीच्या गळ्यात बांधतो, जे हृदयाशी जोडलेले असते. हातात मंगळसूत्र घालणे ही हिंदू परंपरा नाही. शास्त्रांनुसार, ते गळ्यात असणेच अधिक शुभ मानले जाते कारण ते थेट पती-पत्नीमधील आत्मिक बंध दर्शवते.
advertisement
advertisement
advertisement
ज्योतिषशास्त्रीय परिणाम: मंगळसूत्रातील सोने हे 'गुरू' ग्रहाचे प्रतीक आहे. गुरू हा वैवाहिक सुखाचा कारक आहे. हातात मंगळसूत्र घातल्याने जर ते वारंवार जमिनीला स्पर्श करत असेल किंवा अस्वच्छ होत असेल, तर त्याचा गुरू ग्रहावर नकारात्मक परिणाम होऊन वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे.
advertisement
आधुनिक कल आणि वैयक्तिक आवड: आजच्या 'वर्किंग वुमन'साठी गळ्यात मोठे मंगळसूत्र घालणे अनेकदा गैरसोयीचे ठरते. त्यामुळे हातात मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड वाढला आहे. धार्मिक दृष्टिकोनातून ते गळ्यात घालणे श्रेष्ठ असले तरी, बदलत्या काळानुसार ही एक वैयक्तिक पसंती ठरत आहे. मात्र, त्याची शुद्धता आणि आदर राखणे महत्त्वाचे आहे.







