Pune Crime: 'ख्रिसमस पार्टी करू' 13 वर्षीय मुलगी घरात येताच 72 वर्षाच्या म्हाताऱ्यानं लावलं दार अन्...; पुण्यात संतापजनक घटना

Last Updated:

आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून 'ख्रिसमस पार्टी करूया' असे सांगत आपल्या घरी बोलावले. मुलगी घरात गेल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद केला

शाळकरी मुलीचा विनयभंग (AI Image)
शाळकरी मुलीचा विनयभंग (AI Image)
पुणे : पुणे शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून वेगवेगळ्या भागात विनयभंगाच्या तीन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यात सर्वात संतापजनक प्रकार हडपसर जवळील महंमदवाडी परिसरात घडला. यात एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने ख्रिसमस पार्टीच्या बहाण्याने १३ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी कुतबुद्दीन अली महंमद या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
२४ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून 'ख्रिसमस पार्टी करूया' असे सांगत आपल्या घरी बोलावले. मुलगी घरात गेल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन पालकांना सर्व हकीकत सांगितली. यानंतर तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
advertisement
पुण्यातील इतर दोन घटनांमध्येही महिलांना अशाच प्रकारे विकृत मानसिकतेचा सामना करावा लागला. विश्रांतवाडी परिसरात २२ डिसेंबर रोजी रात्री जेवणानंतर शतपावली करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचा दुचाकीस्वाराने विनयभंग केला. तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा करताच आरोपी तिथून पसार झाला असून विश्रांतवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तिसऱ्या घटनेत लष्कर भागात एका पादचारी महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भवानी पेठ येथील बलराज संदुपटला या आरोपीने महिलेला अडवून तिच्या चारित्र्यावर संशय घेत अश्लील वक्तव्य केले आणि तिच्या मुलांना खोट्या पोलीस केसेसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. आरोपी सतत तिचा पाठलाग करत तिला त्रास द्यायचा. सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. सण-उत्सवाच्या काळात शहरात घडलेल्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 'ख्रिसमस पार्टी करू' 13 वर्षीय मुलगी घरात येताच 72 वर्षाच्या म्हाताऱ्यानं लावलं दार अन्...; पुण्यात संतापजनक घटना
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement