शरीराच्या त्या भागावर जेट स्प्रे मारताय; धुळ्याच्या डॉक्टर म्हणाल्या, 'स्वच्छ होत नाही, होतोय उलट परिणाम'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Toilet Jet Spray Side Effects : साधी लघवी जरी केली तरी टॉयलेटमध्ये जेट स्प्रेने लघवीची ती जागा स्वच्छ करण्याची सवय कित्येकांची आहे. पण याचा दुष्परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हल्ली बहुतेक घरांमध्ये वेस्टर्न टॉयलेट आहे. वेस्टर्न टॉयलेट म्हणजे जेट स्प्रे आलाच. त्यामुळे साधी लघवी केली तरी बहुतेक सगळेच जण जेट स्प्रेने ती जागा स्वच्छ करतात. विशेषत: महिला. पण खरंतर जेट स्प्रेने शरीराचा तो प्रायव्हेट पार्ट स्वच्छ होत नाहीच, उलट त्याचा उलटा परिणाम होतो आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वल्वा म्हणजे योनीमार्गाच्या बाहेरची स्किन किंवा त्वचा हे एक सेल्फ प्रोटेक्टिव्ह ऑर्गन आहे. म्हणजे तुम्ही काही केलं नाही तरी नैसर्गिकरित्या ते स्वत:ला स्वच्छ करत असतं. ती आम्ल असते म्हणजे त्याच अॅसिडीक पीएच असतो. त्याच चांगले जंतू म्हणजे हेल्दी बॅक्टेरिया लॅक्टोबॅसेलस असतात. तिसरं म्हणजे त्याच्यावर तेलाचा अगदी पातळ थर असतो.
advertisement
advertisement
advertisement








